| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ ऑक्टोबर २०२४
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनानिमित्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र शासन, दि. 28 ऑक्टोबर 2024 ते 3 नोव्हेंबर 2024 अखेर दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी श्री. उमेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगली जिल्ह्यातील जनतेला लाच देण्यापासून परावृत्त होण्याचे आवाहन केले आहे.
याबाबत जाहीर केलेल्या प्रसिद्धीपत्रकात श्री. उमेश पाटील यांनी म्हटले आहे की, कोणत्याही शासकीय कार्यालयात शासकीय काम करून देण्यासाठी किंवा शासकीय काम केल्याच्या मोबदल्यात शासकीय फी व्यतिरिक्त कोणत्याही स्वरूपात लाची मागणी झाल्यास, संबंधित व्यक्तींनी 1064 या टोल फ्री क्रमांकावर अथवा 95 52 53 98 89 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून तक्रार देऊ शकता, अथवा राजवाडा पिछाडीस, बदाम चौक येथे असलेल्या प्रतिबंधक कार्यालयात समक्ष येऊन तक्रार दाखल करू शकता असे एका प्रसिद्धी पत्रकारद्वारे जाहीर केले आहे.
महाराष्ट्र व केंद्र सरकार सध्या शासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्या विरोधात लाच प्रकरणात अधिक सतर्क झाले असून, गेल्या काही वर्षात ला सुरुवात प्रतिबंधक विभागामार्फत लाच घेणाऱ्या अनेक शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत.