| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २५ ऑक्टोबर २०२४
सांगली विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवारीवरून सुरु असलेल्या वातावरणाचा फार विचार करू नका. पृथ्वीराज पाटील सांगलीच्या आखाड्यात शंभर टक्के असणार आहे. आपली लढाई भाजप विरोधात आहे. त्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आज केले.
येथील काँग्रेस कमिटीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या नियोजनासाठी बैठक झाली. त्यांच्याशी श्री. पाटील यांनी भ्रमण ध्वनीवरून संवाद साधला. तो ध्वनीक्षेपकावरून ऐकवण्यात आला. येत्या २९ ला शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
श्री. पाटील म्हणाले, ‘‘भाजपचा पराभव करणे, हे काँग्रेसचे मुख्य उद्दीष्ट आहे. त्यासाठी काय करायला हवे, याची आमदार विश्वजीत कदम यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पूर्ण कल्पना आहे. दबावाचे राजकारण झाले तरी ते योग्य निर्णय घेतील. माझ्यावर बंडखोरीची वेळ येणार नाही. आलीच तर माझ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आपण लढणार आहोत. लोकसभेप्रमाणे एकजुटीने आपण लढलो तर सांगली शंभर टक्के जिंकू. गेली दहा वर्षे आपण मिळून मेहनत घेतली. गेल्या निवडणुकीत अवघ्या सहा हजार मतांनी पराभवानंतर दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात केली. आजअखेर थांबलो नाही. असे पृथ्वीराज बाबा पाटील यांनी यावेळी सांगितले.
पक्ष कार्यकर्त्यांची संवाद साधताना पृथ्वीराज बाबा पुढे म्हणाले की, पक्ष अधिक तळागाळात नेला. विरोधक म्हणून चोख भूमिका बजावली. महाविकास आघाडी सत्ताकाळात अनेक कामे मार्गी लावली. हजारो लोक, महिला, तरुण, शेतकरी, कष्टकरी काँग्रेससोबत जोडले गेले. या मशागतीला फळ येण्याची ही वेळ आहे. मला खात्री आहे, काँग्रेसचा ‘हात’ आणि सगळ्या नेत्यांची साथ मला मिळेल. कार्यकर्त्यांची साथ, त्यांच्या भावना ऐकून मी अस्वस्थ झालो आहे. हे प्रेम, पाठींबा सहज मिळत नाही. मी तुम्हाला कदापी वाऱ्यावर सोडणार नाही. मी सांगली लढणार. सर्वांनी संयम राखावा.’’ असे आवाहनही त्यांनी त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना केले.
पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून सतत लढाऊ बाणा दाखवला आहे. त्यांना उमेदवारीने काँग्रेसच्या विजयाची दावेदारी मजबूत होणार आहे. पक्षाने ग्राऊंड रिपोर्ट पाहून मेरिटवर निर्णय घ्यावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. बाबांनी रस्त्यावर उतरून मोर्चे, निदर्शने करुन कायम आंदोलने केली आहेत. महापूर आणि कोरोना काळात त्यांनी केलेली सांगलीची सेवा अविस्मरणीय आहे. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून बहुजन समाजाला आरक्षण स्वावलंबी व स्वाभिमानी बनवले आहे. भविष्यात सांगली अधिक चांगली करण्यासाठी त्यांनी संवाद सांगलीसाठी या उपक्रमांतर्गत थेट जनतेशी संवाद साधून विकास आराखडा बनवला आहे. सांगलीचा चौफेर विकास करण्याची त्यांच्याकडे क्षमता व दूरदृष्टी आहे. असाच आमदार सांगलीला हवा यासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला पाहिजे अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांनी केली.
या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अर्ज दाखल करण्याचे नियोजन करण्यासाठी काँग्रेस भवनात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत मंगळवार दि.२९ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ९.०० सांगलीचे आराध्य दैवत श्री गणपती मंदीरात श्री गणेशांचे दर्शन करुन शक्तीप्रदर्शनाने रॅलीचा प्रारंभ आमदार डॉ. विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील व पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. रॅलीचा मार्ग गणपती मंदिर - सराफ कट्टा मार्गे कापड पेठ मेन रोड स्टेशन चौक मार्गे वसंतदादा भवन काँग्रेस कमिटी येथे रॅलीचा समारोप होईल. काँग्रेस भवनासमोर रॅलीचे सभेत रुपांतर होईल. पुढे आमदार डॉ. विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील व काँग्रेसचे नेते यांच्या समवेत पृथ्वीराज पाटील उमेदवारी अर्ज दाखल करतील, असा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
यावेळी ऋतुराज पाटील, माजी नगरसेवक किरण सुर्यवंशी, रज्जाक नाईक, रविंद्र वळवडे, राजेंद्र जगदाळे, दिलीप पाटील, नितीन तावदारे, प्रदीप पाटील, सच्चिदानंद कदम, प्रा.एन.डी.बिरनाळे, अल्ताफ पेंढारी, भारती भगत, सुवर्णा पाटील, कांचन तुपे, अजिज मेस्त्री, शेरुभाई सौदागर, महावीर पाटील, अशोक रास्कर, राजेंद्र मेथे, विक्रम कदम, विकास मोहीते, अजय देशमुख, सनी धोतरे, युवराज पाटील, डॉ. नामदेव कस्तुरे आदी उपस्थित होते. अख्तर आणि व रुबिना मुजावर, विजय आवळे, शितल सदलगे, संभाजी पोळ, ए. डी. पाटील, एन. एम. हुल्याळकर, अजित भांबुरे, अरविंद पाटील, सचिन पाटील, प्रदीप निंबाळकर,आयुब निशाणदार, प्रशांत अहिवळे, बाबगोंडा पाटील, श्रीधर बारटक्के, अरुण पळसुले, पैगंबर शेख, मौला वंटमुरे, प्रशांत माने, इरफान केडिया, गौस नदाफ, अनिल मोहिते, मनोज पवार, आण्णासाहेब खोत, आशा पाटील, नूतन पवार, मनोहर क्रांती कदम, नाना घोरपडे, महावीर पाटील धामणी,सुनील शिंदे, निखिल वठारे, नर्मदा साळुंखे, निर्मला कदम, प्रतिक्षा काळे, सीमा कुलकर्णी, उल्का पवार व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.