| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २३ ऑक्टोबर २०२४
राष्ट्रवादीच्या फाटाफुटीनंतर अजित दादा पवार यांनी पक्षासह घड्याळ हे चिन्हही आपल्या सोबत नेले. त्यामुळे शरद पवार यांनी या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. लोकसभा निवडणुकीत घड्याळ हे चिन्ह वापरण्यास मनाई करावी, ही त्यांची मागणी त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केली. आणि आता विधानसभा निवडणुकीतही घड्याळ चिन्ह वापरण्यास मनाई करण्यास नकार दिला आहे.
काल सुप्रीम कोर्टात शरद पवार यांच्या वतीने विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह वापरण्यास परवानगी नाकारावी अशी मागणी केली होती. हे प्रकरण वादसूचित नसल्याने सुरू नसल्याने, याचिका सुनावणीसाठी घेण्याची विनंती केली. परंतु सुप्रीम कोर्टाने यास नकार देऊन पुढील तारीख देण्याची तयारी दर्शवली. त्यामुळे आता अजितदादा गटात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या निर्णयामुळे शरद पवार राष्ट्रवादीच्या नेते व कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. त्यांना पुन्हा एकदा तुतारी चिन्हावरच विधानसभा निवडणूक लढवावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत तुतारी जिल्हा सारखेच दिसणारे एक चिन्ह वापरले गेल्याने याचा फटका शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला बसला होता. हा मुद्दाही कोर्टाच्या निदर्शनास आणून देणार आला. मात्र याबाबतचा निर्णय कोर्ट नव्हे तर निवडणूक आयोग घेऊ शकते, या मुद्द्यावरून आपली बाजू स्पष्ट केली. आता लोकसभेप्रमाणे या चिन्हाचा फटका बसतो का हे पहावे लागेल. मात्र विधानसभेतही शरद पवारांच्या उमेदवारांना तुतारी हाती घेऊनच प्रचार करावा लागणार आहे.