Sangli Samachar

The Janshakti News

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सांगली पोलीस मुख्यालयामध्ये सीमा समन्वयक बैठकीत कृती आराखडा सादर !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ ऑक्टोबर २०२४
आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने, आंतरराज्य सीमा समन्वय बैठक आयोजित करुन आंतरराज्य तपासणी नाके, प्रलंबित अजामीन वॉरंट, भेटवस्तू साठा व वाटप, अवैध रोख रक्कम वाहतुक व मसल पॉवर/ गुंडा व्यक्ती यांची माहिती सीमेलगत असणाऱ्या कर्नाटक राज्यातील जिल्हा घटकांसोबत देवाण घेवाण करणे बाबत मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कडून सुचित करण्यात आले होते.

त्या अनुषंगाने विशेष पोलीस महानिरीक्षक, श्री. सुनील फुलारी कोल्हापूर परिक्षेत्र, यांचे अध्यक्षतेखाली दिनांक १९-१०-२०२४ रोजी कर्नाटक राज्यासोबत परिक्षेत्रिय स्तरावरील सीमा समन्व्य बैठक आयोजित करण्यात आली. यामध्ये पोलीस महानिरीक्षक, बेळगावी परिक्षेत्र श्री. विकास कुमार विकास. पोलीस उपमहानिरीक्षक, कलबुर्गी श्री. अजय कुमार हिलोरे, पोलीस अधीक्षक, बेळगावी ग्रामीण श्री. डॉ. भिमाशंकर गुळदे, पोलीस अधीक्षक, विजयापूर श्री. प्रसंन्न देसाई, पोलीस अधीक्षक, बिदर श्री. प्रदिप गुट्टी, पोलीस अधीक्षक, कलबुर्गी श्री. अद्दरु श्रीनिवासलु, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर श्री. महेंद्र पंडित, पोलीस अधीक्षक, सांगली श्री. संदिप घुगे, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण श्री. अतुल कुलकर्णी, जिल्हा वन अधिकारी, कोल्हापूर, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर श्रीमती स्नेहलता शिलकर, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. सचिन सावदेकर कोल्हापूर उपस्थित होते.


सदर बैठकीमध्ये आंतरराज्य सीमा तपासणी नाके कार्यान्वीत करण्यात आले आहेत. कर्नाटक राज्यातील बेळगावी ग्रामीण, बिदर, विजयापूर व कलबुर्गी या घटकांनी सुध्दा सीमावर्ती भागात तपासणी नाके कार्यान्वीत करणे. अजामीन पात्र वॉरंट, पाहीजेत/फरारी आरोपी, सीमा भागातील गुन्हेगारी टोळया व गुन्हेगार यांची माहिती एकमेकांना प्रदान करणे. अजामीनपात्र वॉरंट बजावणीस प्राधान्य देणे ज्यामुळे निवडणूक कालावधीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या गुन्हेगारांवर निर्बंध ठेवता येतील. 

कर्नाटक व महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील पोलीस ठाणे स्तर व उपविभाग स्तरावर सीमा समन्वय बैठकीचे आयोजन करून पोलीस ठाणे व उपविभाग यांचे कडील गोपनिय माहितीचे आदान प्रदान करणे. अवैध शस्त्र, रोख रक्कम, मद्यसाठा, गुटखा व अंमली पदार्थ यांची वाहतूक व साठा याबाबतची संपूर्ण माहिती दोन्ही बाजूंकडून एकमेकांना पुरविणे. सीमावर्ती भागात महाराष्ट्रांकडील घटकांकडून ज्याप्रमाणे ईटिग्रेटेड चेक पोस्ट कार्यान्वीत करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कर्नाटक राज्यातील सीमावर्ती भागात इंटिग्रेटेड चेक पोस्ट सुरु करणेबाबत कार्यवाही करणे. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर यांनी मद्यसाठा व वाहतुक यांवर कारवाई करताना पोलीस विभागा सोबत संयुक्त मोहिम राबविणे. इत्यांदी बाबिंची चर्चा करण्यात आली. यासाठी वनविभाग व प्रादेशिक परिवहन विभाग हे सहकार्य व समन्वयन करणार आहेत.