yuva MAharashtra प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची अ. भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड ! विविध घटकातून अभिनंदनचा वर्षाव !

प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची अ. भा. मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड ! विविध घटकातून अभिनंदनचा वर्षाव !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ७ ऑक्टोबर २०२४
दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यंदाच्या अध्यक्षपदी डॉ. ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यातील साहित्य परिषदेच्या पत्रकार परिषदेत अध्यक्षांची घोषणा झाली आहे. 

प्रा. डॉ. तारा भवाळकर या लोक संस्कृतीच्या अभ्यासक आहेत. त्यांचं वय ८३ वर्षे इतकं आहे, तरीही उत्साह तरुणाना लाजवेल असा आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष प्राध्यापक उषा तांबे यांनी प्रा. डॉ. भवाळकर यांच्या नावाची घोषणा केली. त्या सहाव्या महिला अध्यक्षा आहे. ९८ वर्षात ६ महिला अध्यक्षा राहिल्या आहेत. त्यातल्या सहाव्या डॉ. तारा भवाळकर आहेत तर पाचव्या अरुणा ढेरे होत्या.

डॉ. तारा भवाळकर यांचा जन्म १ एप्रिल १९३९ मध्ये झाला. प्रामुख्याने वैचारिक लेखन करणान्या एक मराठी लेखिका आहेत. प्राध्यापक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं आहे. निवृत्त झाल्यावर पुण्यातील ललित कला अकॅडमी आणि मुंबई विद्यापीठ लोककला अकॅडमीमध्ये अतिथी प्राध्यापक देखील होत्या, त्यांना लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि लोककला विषयांचं लेखन आणि गाढा अभ्यास आहे. लोकसंस्कृती, नाट्यसंशोधन, संतसाहित्य, एकांकिका, ललित लेखन, लोककला आणि खी जाणिवांवर भाष्य करणारे लेखन त्यांनी केलं आहे. 

मराठी विश्वकोश, मराठी वाड्मयकोश आणि मराठी ग्रंथकोश या महत्त्वाच्या संमेलनाध्यक्षाची निवड करण्यासाठी आधी साहित्य महामंडळाने पुण्यात शनिवारी आणि रविवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेत बैठक घेतली होती, या बैठकीत विविध नावांवर चर्चा करण्यात झाली. त्यात महामंडळाचे पदाधिकारी तसेच साहित्य महामंडळाच्या घटक संस्था, संलग्न संस्था आणि समाविष्ट संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत तीन दिवसांचे कार्यक्रम, ग्रंथ दालन, ग्रंथ आदी विषयांवर चर्चा झाली. घटक संस्थांकडून साहित्य महामंडळाकडे प्राप्त झालेल्या नावावर चर्चा करून भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. आज पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. 


गेल्या चार ते पाच वर्षांपूर्वी दिल्लीला संमेलन घेण्याबाबत चर्चा सुरू झाली होती. मात्र काही कारणास्तव दिल्लीला संमेलन होऊ शकले नाही. यंदा मात्र सरहद संस्थेला दिल्लीत संमेलन आयोजनाचा मान मिळाला. याआधी १९५४ मध्ये दिल्लीत संमेलन झाले होते.

संमेलनाध्यक्षपदासाठी डॉ. तारा भवाळकर यांचे नाव आघाडीवर होते. त्यानंतर प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, माजी प्रशासकीय अधिकारी ज्ञानेश्वर मुळे, सामाजिक कार्यकर्ते अभय बंग आदी नावांचीही चर्चा होती. पण भवाळकर यांनी बाजी मारली. लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक, समीक्षक डॉ. तारा भवाळकर हे संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावे, असे व्यक्तिमत्व आहे. लोकसाहित्याचा मूलगामी शोध घेणाऱ्या व लोकसाहित्याची मूलगामी समीक्षा करणाऱ्या मीमांसक म्हणून त्यांना ओळखले जाते. ताराबाई आज वयाच्या ८३ व्या वर्षीही लिखाणापासून समाजमाध्यमांपर्यन्त सर्वत्र कमालीच्या सक्रिय असतात. गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ त्या सातत्याने कार्यरत आहेत.

लोकसाहित्य, लोकसंस्कृती, नाटक यांच्या सखोल अभ्यासावर त्यांचा वैचारिक पिंड उभा राहिला आहे. त्यामुळे त्यांना पाहिले की, एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा त्यांच्यात दिसून येते. पुस्तक तिसऱ्या बिंदूच्या शोधात, प्रियतमा मरणात खरोखर जग जगते, मराठी नाटक नव्या दिशा, नवी बळणे, मराठी नाट्यपरंपरा शोध आणि आस्वाद, यक्षगान आणि मराठी नाट्य परंपरा, लोकनागर रंगभूमी (माहितीपर), लोकपरंपरा आणि श्रीप्रतिभा या त्यांच्या साहित्यकृती आजरामर ठराव्यात.

आपली निवड झाल्या प्रसंगी बोलताना प्रा. डॉ.. तारा भवाळकर म्हणाल्या की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली, याचा आनंद आहे. आदिमावस्थेपासून आधुनिक काळापर्यंतचा मानवी जीवनाचा प्रवास लोकपरंपरेतच प्रतिबिंबित झाला आहे. मराठी साहित्य संमेलनाने माझ्या निवडीतून जात्यावर दळण दळणाऱ्या भगिनी ते विविध लोककलावंतांचा सन्मान केला आहे. मी निमितमात्र आहे. 
महाराष्ट्रात अनेक चांगले साहित्यिक, लेखक आहेत. ज्यांना हा मान मिळाला नाही, अशा सर्वांना हा सन्मान समर्पित करते. माझी निवड केली त्या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. आजवरच्या माझ्या प्रवासात ज्या साहत्यिकांनी, लोकपरंपरा जपणाऱ्या कलावंतांनी, अभ्यासकांनी तसेच विविध क्षेत्रातील लोकांनी मोलाची साथ दिली. त्या सर्वांमुळे मला हा मान मिळाला, लोकसंस्कृतीचे महत्व अधोरेखीत करणारी ही निवड आहे, असेही प्रा. डॉ. भवाळकर यांनी म्हटले आहे.

प्रा. डॉ. भवाळकर यांना मिळालेले पुरस्कार

पुणे विद्यापीठाच्या सर्वोत्कृष्ट प्रबंधासाठी पुरस्कार, १९८२, बँक ऑफ बडोदा, सांगलीः कृतज्ञता पुरस्कार, १९९०, महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार लोकसंचित ग्रंथासाठी, १९९२, अखिल भारतीय दलित साहित्य अकादमी दिल्लीः डॉ. बाबासाहेच आंबेडकर गौरववृत्ती, १९९४, मंगल पुरस्कार, कोल्हापूर विशेष कर्तृत्ववान श्रीसाठी साहित्यिक क्षेत्रातील कार्यासाठी, १९९५, श्री. ना. बनहट्टी पुरस्कार, पुणे नगर बाचन मंदिर, पुणे मराठी नाट्यपरंपरा शोध आणि अरस्वाद या ग्रंथासाठी, १९९६, वि.म. गोखले पुरस्कार महाराष्ट्र साहितत्य परिषद, पुणे मराठी नाट्धपरंपरा शोध आणि आस्वाद या ग्रंथासाठी, १९९६, विशेष वाङमय पुरस्कार वाडमय चर्चा मंडळ, बेळगाव माझिया जातीच्या या ग्रंथासाठी, १९९७, वांग्मय समीक्षा प्रथम पुरस्कार वाड्मय चर्चा मंडळ, बेळगाव, मराठी नाटक नव्या दिशा नवी वळणे या ग्रंथासाठी, १९९८, कै. मालतीबाई दांडेकर जीवनगौरव पुरस्कार साहित्यप्रेमी मंडळ, पुणे, २००४, के. प्र. महिला गौरव पुरस्कार, २००५, शिवलीला सांस्कृतिक कलामंच, सांगली महिला गौरव पुरस्कार, २००६, विशाखा वतीने पुरस्कार, नाट्यपंढरी लातूर, आकलन आणि आस्वाद या ग्रंथासाठी, २००६, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे जीवनगौरव पुरस्कार, २००६, शरदचंद्र चट्टोपाध्याय पुरस्कारः म. सा. परिषद, पुणे, २००७, लोकसंस्कृती, नाट्यसेवा पुरस्कार नाट्य चित्रपट कलाकार तंत्रज्ञ कल्याण ट्रस्ट, सांगली, २०१०, विशेष सन्मानवृत्ती महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई, २०११, डॉ. निर्मलकुमार फडकुले प्रतिष्ठान साहित्य सेवा पुरस्कार, सोलापूर, २०११, सूर्योदय सेवारत्न पुरस्कार, जळगांव, २०१२, ज्ञानेश प्रकाशन, पुणे पुरस्कृत शैलजा काळे स्मृती पुरस्कार, २०१३, कै. डॉ. अ. का. प्रियोळकर स्मृती पुरस्कार मुंबई विद्यापीठ, २०१३, रानशारदा पुरस्कार सह्याद्री वाहिनी दूरदर्शन, २०१५, यशस्विनी पुरस्कार संवाद, वाई, २०१५, साहित्य रत्न पुरस्कार रत्नाप्पाअण्णा कुंभार स्मृतीमंच, जयसिंगपूर, २०१६, लोकमत सखीमंच जीवन गौरव पुरस्कार, सांगली, २०१६, गार्गी पुरस्कार श्री. सिध्दिविनायक न्यास, मुंबई, २०१६, सु.ल. गद्रे साहित्य पुरस्कार साहित्य संघ, मुंबई (मुलुंड), २०१६, काकासाहेब खाडिलकर जीवन गौरव पुरस्कार अ.भा. मराठी नाट्य परिषद, सांगली, २०१७, पद्मश्री विखे पाटील जीवनगौरव पुरस्कार अहमदनगर, २०२१ अशा विविध पुरस्काराने प्रा. डॉ. तारा भवाळकर यांना गौरवण्यात आले आहे.