yuva MAharashtra फसव्या कारखान्यांची फसवी एफ. आर. पी. शेतकऱ्यांनी का मान्य करावी ? आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांचा सवाल !

फसव्या कारखान्यांची फसवी एफ. आर. पी. शेतकऱ्यांनी का मान्य करावी ? आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांचा सवाल !


| सांगली समाचार वृत्त |
शिरोळ - दि. ६ ऑक्टोबर २०२४
कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने उसाचा दर किती देणार ? असं विचारलं की नेहमी सांगतात, एकरकमी एफ आर पी देणार. ती एफ आर पी म्हणून किती देणार हे मात्र मुद्दाम कोणीच सांगत नाही. कारण ती एफ आर पी ही गेल्या वर्षी दिली तेव्हडीच असते, म्हणून ते कधीही रक्कम सांगत नाहीत. या कारणामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. म्हणूनच पासवर्ड कारखान्यांची कशी एफआरपी शेतकऱ्यांच्या स्वीकाराने असावा आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

गेल्या हंगामात दत्त, शिरोळ गुरुदत्त, टाकळी जवाहर हुपरी आणि शरद नरंदे यांनी एफ आर पी म्हणून 3100 रुपये दिले होते. पंचगंगा इचलकरंजी यांनी 3300 रुपये दिले होते.
येत्या हंगामात या कारखाण्यांची नियमानुसार एफ आर पी किती निघणार आहे ते पहा :-
दत्त शिरोळ 3155
शरद नरंदे 3065
जवाहर हुपरी 3148
गुरुदत्त टाकळी 3178
पंचगंगा इचलकरंजी 3352

येत्या हंगामात सगळ्याच कारखान्यांची ( शरद वगळता ) फक्त 50 रुपये च्या आसपास एफ आर पी वाढणार आहे. तर शिरोळचे आमदार असलेल्या शरद कारखान्याची एफ आर पी ही गेल्या वर्षी पेक्षा 50 रुपये कमीच निघणार आहे. आश्चर्य म्हणजे केंद्र सरकारने येत्या हंगामासाठी 250 रुपये एफ आर पी वाढवली असताना ती वाढसुद्धा शेतकऱ्यांना कारखाने देणार नाहीत. हे या आकडेवारी वरून स्पष्ट होत आहे. एफ आर पी न वाढण्याची दोन कारणे आहेत.
एक म्हणजे सरासरी रिकव्हरी कमी केल्याने आणि दुसरे कारण आहे तोडणी वाहतूक खर्चात अवास्तव वाढ केल्यामुळे हे होत आहे. कारखान्यांचा तोडणी वाहतूक खर्च किती आहे बघा :-
दत्त शिरोळ 887
शरद नरंदे 930
जवाहर हुपरी 906
गुरुदत्त टाकळी 973
पंचगंगा इचलकरंजी 881
गेल्या वर्षी पेक्षा जवळपास 150 च्या पुढेच तोडणी वाहतुकीचा खर्च कारखान्यांनी वाढवला असल्यामुळेच केंद्र सरकार ने दिलेली एफ आर पी तील वाढ शेतकऱ्यांना कधीच मिळत नाही.


उदाहरण म्हणून बघा :-
2014 ला उसाची एफ आर पी होती 1950 रुपये ती वाढून 2024 ला 3400 झाली. म्हणजेच गेल्या 10 वर्षात केंद्राने 1450 रुपये एफ आर पी मध्ये वाढ केली. 2014 ला कारखान्यांनी उसाला दर दिला होता 2500 आणि 2024 ला दर दिला 3100. 

10 वर्षात उसाचा दर फक्त 600 रुपयने वाढला 
केंद्राने मागच्या 10 वर्षात जी 1450 रुपये वाढ केली ती वाढ पण शेतकऱ्यांना मिळालेली नाही.
ती फक्त वाढ जरी कारखान्यांनी दिली असती तर गेल्या वर्षीच शेतकऱ्यांना 4000 रुपये दर मिळाला असता. कारखाने एफ आर पी च्या आडून उसाचा दर वाढूच असे षडयंत्र रचत असल्यामुळे कारखाने सांगत असलेल्या एफ आर पी ला शेतकऱ्यांनी न भुलता उसाचा परवडणारा दर मागणे योग्य ठरणार आहे.

जोपर्यंत कारखाने मागील हंगामाचा परवडणारा दर देत नाहीत, चालूला किती देणार हे जाहीर करत नाहीत, तोपर्यंत शेतकऱ्यांनी ऊसाच्या तोडी घेऊ नयेत अशी आमची विनंती या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.