| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ ऑक्टोबर २०२४
सकल जैन समाजाने पंत विरहित एकत्र येणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन जैन आर्थिक विकास महामंडळाचे प्रथम अध्यक्ष ललित गांधी यांनी त्यांच्या सकल जैन समाज आयोजित केलेल्या नागरिक सत्कारमध्ये केले.
आज जैन समाजामध्ये आर्थिक दुर्बल घटक देखील आहेत, जे शेतमजूर किंवा कामगार म्हणून काम करत आहेत. समाजातील अशा लोकांना आता महाराष्ट्र शासनाच्या वतीने जैन आर्थिक विकास महामंडळातून त्यांना सक्षम करणे, रोजगार उपलब्ध करून देणे विन व्याज परतावाची कर्ज, व्यापारी उद्योजकांना उपलब्ध करून देणे, याबाबत अनेक योजनांची त्यांनी माहिती दिली तसेच या मार्गदर्शन देखील केले.
सकल जैन समाज सांगली जिल्ह्याच्या वतीने काल येथील कच्ची भवन मध्ये श्री. ललित गांधी, दक्षिण भारत जनसभेचे नूतन अध्यक्ष श्री भालचंद्र पाटील कच्ची ओसवाल जैन समाज महाराष्ट्रचे अध्यक्ष श्री.नवीन भाई शहा तसेच जैन आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य श्री. रावसाहेब पाटील यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वप्निल शहा, जैन फाउंडेशनचे अण्णासाहेब पाटील, भरत निलाखे, समीर फुरिया, अतुल शहा, देशभूषण पाटील प्रशांत शहा, विनोद पाटील, रमेश आरवाडे यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया महाजन यांनी केले. याप्रसंगी रावसाहेब पाटील तसेच भालचंद्र पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले व तसेच या सत्कार बद्दल समाजाचे आभार मानले.