| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ७ ऑक्टोबर २०२४
सध्या सर्वत्र नवरात्र उत्सव साजरा होत असताना, 'जागर नवरात्रीचा सन्मान नारीशक्तीचा' या संकल्पनेतून, नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या, समाजातील विविध क्षेत्रांमध्ये योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
सत्कार झालेल्या महिलांमध्ये पहिल्या दिवशीच महापालिकेच्या क्षेत्रात स्वच्छता कर्मचारी म्हणून कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार त्यांच्या हस्ते संपन्न झाला. दुसऱ्या दिवशी बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. डॉक्टर, नर्सेस, सामाजिक कार्यकर्त्या, एसटी कंडक्टर, महिला, महिला पत्रकार, , अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगार महिला, अशा वेगवेगळ्या महिलांचा प्रत्येक दिवशी सत्कार करण्यात येणार असून, सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी असेच उपक्रम उर्वरित नवरात्र उत्सवात साजरे करण्यात येणार आहेत.
याचाच एक भाग म्हणून पहिल्या दिवशीच व्यसनाच्या रावणाचे दहन करण्यात आले. तर दुसऱ्या दिवशी लहान मुलीवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण हा विषय गांभीर्याने घेऊन वेगवेगळ्या शाळेमध्ये लहान मुलींना 'गुड टच बॅड टच' याची ओळख तज्ञांच्या मार्फत करून देण्यात आली. तिसऱ्या दिवशी महापालिकेच्या शाळा नंबर 26 येथे महिला व महिला कर्मचारी यांचे आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. त्यानंतर प्लास्टिक मुक्ती, पर्यावरण संवर्धन, वाहतुकीच्या नियमांचे पालनाबाबत जागृती, सांगली सिव्हिल हॉस्पिटल मध्ये नवरात्रीमध्ये जपणाऱ्या नवजात मुलींचा व मातांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी सामाजिक भान ठेवून आपला सन्मान केल्याबद्दल सत्कारमूर्ती महिलांनी जयश्रीताई पाटील यांचे आभार मानले.