| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २३ ऑक्टोबर २०२४
साधारण अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात जबरदस्ती भूकंप घडला आणि शिवसेनेची दोन छकले होऊन, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चाळीस आमदारांनी महायुतीत प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांना याचे बक्षीस म्हणून मुख्यमंत्री पद, तर त्यांच्या काही आमदारांना मंत्रिपद बहाल करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यापूर्वी एकनाथ शिंदे हे आपल्याच चाळीस आमदारांसह गुवाहाटीला गेले होते. त्यावेळी "काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, ओक्केमध्ये आहे सगळं !" हा आ. शहाजी बापू पाटील यांचा डायलॉग सर्वत्र तुफान व्हायरल झाला होता.
मुख्यमंत्रीपदी अरुण झाल्यानंतर गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीची पूजा केली होती. काल अचानक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीला प्रस्थान केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र यावेळी एकनाथ शिंदे हे आपल्या आमदारांसमवेत नव्हे तर एकटेच गुवाहाटीला गेले आहेत. त्यामुळे भाजपने त्यांची कोंडी केल्याच्या कारणावरून ते नाराज होऊन गुवाहाटीला गेले आहेत की काय ? अशी शंका महाराष्ट्रातून व्यक्त होत होती. परंतु एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटीला जाण्याचे नेमके कारण समोर आले आहे.
आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कामाख्या देवीची पूजा करून आशीर्वाद घेण्यासाठी गुवाहाटीला गेले आहेत. तिथून आल्यानंतर ते आज विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यानंतर शिंदे शिवसेनेकडून उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. या यादीत प्रस्थापितांनाच संधी मिळणार, की नव्या चेहऱ्यांना वाव वाव दिला जाणार ? अशी चर्चा आता रंगली आहे.
शिंदे गटातील एका नेत्याच्या माहितीनुसार, भाजप 120 ते 150 जागा लढवणार असून, त्या खालोखाल शिंदे शिवसेनेला 90 जागा देण्यात आल्या आहेत. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला उर्वरित जागावर समाधान मानावे लागणार आहे.
मात्र अद्याप महायुतीतील भाजपा, शिंदे शिवसेना आणि अजित दादा यांची राष्ट्रवादी यांना नेमक्या किती जागा लढवणार ? आणि इतर मित्र पक्षांना किती जागा सोडण्यात येणार आहेत ? याबाबत कोणताही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली नाही. सध्या तरी जागा वाटपाबाबत करण्यात येत आहेत.