Sangli Samachar

The Janshakti News

सुधीरदादा गाडगीळ यांचा झंजावाती प्रचार सुरू, वृत्तपत्र विक्रेते खेळाडू यांची भेट व सविस्तर चर्चा !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ ऑक्टोबर २०२
सांगली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी झंझावाती प्रचाराला सुरुवात केली आहे. गुरुवारी मोठ्या उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पहाटेपासून दादांनी प्रचार फेरीला सुरुवात केली.

सांगली शहरातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या केंद्राला दादांनी पहाटे भेट दिली. त्या ठिकाणी विकास सूर्यवंशी, दरीबा बंडगर आदींनी त्यांचे स्वागत केले. सर्व विक्रेते त्यावेळी उपस्थित होते. वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी महायुती सरकारने महामंडळ स्थापन केल्याबद्दल यावेळी वृत्तपत्र विक्रेत्यांनी दादांचे अभिनंदन केले व आभार मानले. दादांनी वृत्तपत्र विक्रे त्यांच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली.

यानंतर सुधीर दादा पोहोचले ते आमराईमध्ये. रोज सकाळी फिरायला या ठिकाणी मोठी गर्दी असते. त्या नागरिकांची दादांनी सकाळी भेट घेतली. त्यांच्यासोबत किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान पृथ्वीराजभैय्या पवार शहरातील स्टेडियम तसेच खेळाडूंच्या सगळ्या विषयाबाबत कायमच मी त्यांच्या सोबत आहे असे दादांनी सांगितले.


आमराई संदर्भात दादांनी तेथील नागरिकांशी चर्चा केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथेही त्यांनी भेट दिली. तेथे खेळाडू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्याशी त्यांनी यावेळी दादांच्या सोबत अतुल माने, रवींद्र ढगे, उदय मुळे, चेतन माळगूळकर, भूपाल सरगर, आशिष साळुंखे, राजू बावडेकर, अशोक अण्णा शेट्टी, संजय परमणे, समीर शेट्टी, राजू कुंभार, सुशांत काटे, अनिकेत बेळगावे, मनोज भिडे, अभिषेक कुलकर्णी, एस एल पाटील, युवराज कटके आदी कार्यकर्ते नागरिक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

या सर्वच ठिकाणी सुधीरदादा गाडगीळ यांचे उस्फूर्त स्वागत करण्यात आले. दादांनी येथील नागरिक व खेळाडूंची साधलेला संपर्क, त्यांच्याशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा, जाणून घेतलेल्या समस्या आणि त्या सोडवण्याबाबत त्याचे दिलेले आश्वासन, यांची संपूर्ण मतदारसंघ दिवसभर चर्चा सुरू होते. सुधीर दादा गाडगीळ यांची गेल्या दहा वर्षात केलेली कामगिरी यामुळे सुधीरदादा गाडगीळ यंदा हॅट्रिक साधन असा विश्वास सर्वत्र व्यक्त होत आहे.