yuva MAharashtra प्रा. भीमराव धुळूबुळू यांना आचार्य अत्रे प्रतिभारंग पुरस्कार जाहीर !

प्रा. भीमराव धुळूबुळू यांना आचार्य अत्रे प्रतिभारंग पुरस्कार जाहीर !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ ऑक्टोबर २०२
मिरज येथील ज्येष्ठ कवी, साहित्यिक प्रा. भीमराव धुळूबुळू यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सांगली शाखेतर्फे आचार्य अत्रे प्रतिभारंग पुरस्कार जाहीर झाला आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या सांगली शाखेचे प्रमुख कार्यवाह विशाल कुलकर्णी यांनी त्यांना याबाबतचे पत्र दिले. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल तसेच त्यांच्या काव्यसंग्रहास यापूर्वी अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

सदर पुरस्कार वितरण रंगभूमी दिनाच्या पूर्वसंध्येला ४ रोजी सायंकाळी ५ वाजता विष्णुदास भावे नाट्यमंदिर सांगली येथे होणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सांगली शाखेतर्फे प्रतिवर्षी विविध पुरस्कार देऊन मान्यवर कलाकारांचा गौरव केला जातो. पुरस्काराचे हे आठवे वर्ष आहे. आपल्या उज्ज्वल कारकिर्दीबद्दल शाखेतर्फे कै. आचार्य अत्रे प्रतिभारंग पुरस्कार देण्याचा निर्णय झाल्याचे प्रा. धुळुबुळू यांना देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे. 


अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा आचार्य अत्रे प्रतिभारंग पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल साहित्य, शिक्षण, सामाजिक अशा क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.