Sangli Samachar

The Janshakti News

विदर्भातील जागा वाटपावरून महाआघाडीचा बिघाडी, ठाकरे-पटोले यांच्यात वादावादी !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १९ ऑक्टोबर २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीत एक संघपणे महायुती समोर तगडे आव्हान उभे करण्याचे स्वप्न बाळगलेल्या महाआघाडीला आत्ताच तडे गेल्याचे पहावयास मिळाले, महाराष्ट्रातील बहुसंख्या मतदारसंघात एकमताने निर्णय झाला असला तरी, काही मतदारसंघात तिन्ही पक्षांमध्ये टोकाचे मतभेद आहेत. त्यामुळे या ठिकाणी जागा वाटपाच्या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व ठाकरे शिवसेनेचे संजय राऊत यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.

जागा वाटपात अद्याप 25 ते 30 जागावर जोरदार रस्सीखेच सुरू आहे. गत लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मोठ्या फरकाने विजय मिळवला असल्याने, सध्या काँग्रेसकडे मोठा भाऊ म्हणून पाहिले जात आहे. दोन नंबर वर असलेल्या ठाकरे शिवसेनेने आपले हौसले बुलंद असल्याचे दाखवून दिले आहे. 

विदर्भातील जागा वरून काल झालेल्या बैठकीत नाना पटोले व संजय राऊत यांच्यामध्ये चांगलेच खटके उडाले. नाना पटोले यांच्या हटवादी भूमिकेमुळे महाआघाडीतील समझोता एक्सप्रेस अडून बसली आहे. इतकेच नव्हे तर ठाकरे गटाने नाना फोटो यांच्या विरोधात दिल्लीश्वराकडे तक्रार केली आहे.


विदर्भात ठाकरे गट आणि काँग्रेस दोघांचीही ताकद मोठी आहे. लोकसभा निवडणुकीत विदर्भातील मतदार संघात जरी ठाकरे गटाला काही प्रमाणात अबीयशाले असले तरी, विधानसभेचे गणित वेगळे असल्याचे सांगत या ठिकाणी अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याची रणनीती ठाकरे गटाने आखरी आहे. त्या बदल्यात काँग्रेसने पश्चिम महाराष्ट्रातील आपल्या वाट्याच्या जागा घ्याव्यात असे संजय राऊत यांनी सुचवले होते. परंतु नाना पटोले यांनी त्याला वाटाण्याच्या अक्षदा लावल्या.

मतभेदाची ही जरी मिटवून तातडीने विधानसभा निवडणुकीस सामोरे जाण्यासाठी तयार होण्याचे आवश्यकता महाआघाडीतील मधला भाऊ राष्ट्रवादीने दोन्ही गटात सामंजस्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र अद्याप तरी त्याला यश आले नाही. त्यामुळे अर्ज भरण्याच्या तारखेपर्यंत हे मतभेद दूर होतील का ? असा सवाल केला जात आहे.