yuva MAharashtra महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवत असल्याच्या निषेधार्थ, राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे करण्यात आंदोलन !

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवत असल्याच्या निषेधार्थ, राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे करण्यात आंदोलन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ७ ऑक्टोबर २०२४
आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने केंद्र व राज्य सरकार च्या विरोधात निषेध नोंदवत तीव्र आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील साहेब व युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या सूचनेनुसार, सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा. संजयजी बजाज साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व युवक सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा. राहुलदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन पार पडले.

सातत्याने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला हलवण्यात येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी तरूणांच्या हातातील रोजगार कमी होत चालला आहे. प्रचंड बेरोजगारी वाढत चालली आहे. सातत्याने केंद्र सरकार व राज्यातील खोके सरकार हे येथील उद्योग गुजरातला घेऊन जात आहे. यामुळे मराठी तरुण बेरोजगारीने त्रस्त झाला आहे. अशा निर्णयांमुळे मराठी तरुणांना हक्काचा रोजगार गमवावा लागत आहे. अशी भावना यावेळी शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज साहेब व युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार यांच्या सह युवक संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी यांनी व्यक्त केली. सदर आंदोलनात केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देत युवकांच्या कमी होत जाणाऱ्या रोजगारा संदर्भात निषेध व्यक्त करण्यात आला.


यावेळी पक्षाचे सांगली शहरजिल्हाध्यक्ष संजयजी बजाज साहेब, युवक शहरजिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार, कार्याध्यक्ष संदीप व्हनमाणे, उत्तम कांबळे, अरुण चव्हाण, शहाबाज कुरणे, सद्दाम मुजावर, समीर कुपवाडे, डॉ शुभम जाधव, महालिंग हेगडे, शितल खाडे, आकाराम कोळेकर, अक्षय अलकुंटे, सुमुख पाटील, वाजीद खतीब, राहुल यमगर, आदित्य नाईक, अमित पाटील, अक्षय गायकवाड, संतोष कांबळे, उमर शेख, सयाजी बनसोडे, सौरभ तहसीलदार, यासिन मुश्रीफ, अवधूत दुधाळ,अदनान पठाण यांच्यासह मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.