yuva MAharashtra दिवंगत नेते स्व. मदनभाऊ पाटील यांना काँग्रेस कमिटीमध्ये पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !

दिवंगत नेते स्व. मदनभाऊ पाटील यांना काँग्रेस कमिटीमध्ये पुण्यतिथीनिमित्त अभिवादन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १७ ऑक्टोबर २०२४
सांगली जिल्ह्याचे धडाडीचे नेते माजी मंत्री स्वर्गीय मदन भाऊ पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी येथे अभिवादन करण्यात आले. प्रारंभी मदनभाऊ पाटील यांच्या प्रतिमेस, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी बोलताना, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष व माजी सभापती महावीर कागवाडे यांनी मदनभाऊ पाटील यांनी जिल्ह्यामध्ये आपल्या कार्याने एक आगळावेगळा ठसा उमटविला होता. त्यांच्या कारकिर्दीमध्ये सांगली महापालिकेमध्ये काँग्रेसचे काम अत्यंत सक्षमपणे चालू होते. त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला अत्यंत मानाचे स्थान देऊन महापौरपदी, मार्केट कमिटी सभापती, जिल्हा मध्यवर्ती बँक अशा ठिकाणी स्थान देऊन प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांनी बळ दिले होते, असे प्रतिपादन केले.


यावेळी सुभाषतात्या खोत यांनीही मदन भाऊंच्या कार्याचा आढावा घेऊन, आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी उच्च पदावर नेऊन आमचा सन्मान केलेला आहे. आज त्यांच्या पश्चात श्रीमती जयश्रीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी काँग्रेस पक्षाचा विचार लोकापर्यंत पोहोचवावा, हीच त्यांना मदनभाऊ यांना आदरांजली ठरेल, असे सांगितले.

सुरुवातीस काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तर शेवटी प्रदेश संघटक सचिव पैगंबर शेख यांनी आभार मानले. 

यावेळी माजी नगरसेवक संतोष पाटील, माजी नगरसेविका रोहिणी पाटील, जिल्हा काँग्रेसचे शिवाजीराव मोहिते, ॲडव्होकेट भाऊसाहेब पवार बाबगोंडा पाटील, विठ्ठलराव काळे, संजय पाटील, नितीन खोत, चिंटू पवार, संजय कांबळे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष देशभूषण पाटील, अल्ताफ पेंढारी, संजय पाटील, विश्वास यादव, रवी खराडे, शिवाजीराव सावंत, प्रमोद आवळे, नामदेव पठाडे, सौ. प्रतिक्षा काळे, प्रथमेश शेटे, मुफीत कोळेकर, अन्वर इनामदार, दत्तात्रय माने, जुबेर तहसीलदार, विवेक अंकलीकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.