| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ ऑक्टोबर २०२४
भविष्यात पुढच्या पिढीला चांगली पर्यावरण देण्याची जबाबदारी आपली आहे, त्यामुळे ग्रामीण स्तरावर छोट्या छोट्या गोष्टीतून शाश्वत पद्धतीने प्रयत्न झाले पाहिजेत अशी अपेक्षा सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी व्यक्त केली आहे.
राज्य शासनाने आयोजित केलेल्या माझी वसुंधरा स्पर्धेमध्ये सांगली प्रथम आली आहे तर जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतीनी विविध गटामध्ये यश मिळवलेले आहे. यामध्ये सहभागी असलेल्या ग्रामपंचायतींचे पदाधिकारी व अधिकारी यांचा सन्मान जिल्हा परिषदेच्या वसंतदादा पाटील संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात करण्यात आला यावेळी धोडमिसे बोलत होत्या.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, ग्रामपंचायती विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.