| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १२ ऑक्टोबर २०२४
हिंदू धर्मात दसऱ्याच्या सणाला विशेष महत्त्व आहे. हा केवळ सण नसून वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे.
या दिवशी माणसाच्या आत असलेला अहंकार, वाईट विचार आणि चुकीची वागणूकही संपुष्टात यावी, अशी प्रार्थना केली जाते.
सीमा ओलांडून आव्हानांच्या
गाठू शिखर यशाचे!
प्रगतीचे सोने लुटून!
सर्वांमध्ये हे वाटायचे!!
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
🌹
दिन आला सोनियाचा
भासे घरा ही सोनेरी
फुलो जीवन आपुले
येवो सोन्याची झळाळी
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
लाखो किरणी उजळल्या दिशा,
घेऊनी नवी उमेद, नवी आशा,
होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
🌹
बांधू तोरण दारी,
काढू रांगोळी अंगणी..
उत्सव सोने लुटण्याचा…
करुनी उधळण सोन्याची,
जपू नाती मनाची, दसरा शुभेच्छा.
जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार भेदभाव
सोने लुटूया प्रगत विचारांचे..
करुन सिमोल्लंघन,
साधूया लक्ष विकासाचे…
आपणा सर्वांना दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
🌹
वाईटावर चांगल्याची मात
महत्व या दिनाचे असे खास
जाळोनिया द्वेष- मत्सराची कात
मनोमनी वसवी प्रेमाची आस
दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
🌹
सदिच्छांची ही सोनेरी किरणे पसरो तुमच्या आयुष्यात
दसऱ्याचा हा सुवर्णक्षण अखंड नांदो तुमच्या जीवनात
शुभमुहूर्ताचा हा दसरा होवो आपणांस लाभाचा
आपल्या जीवनात बरसो पाऊस सुवर्णांचा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
🌹🌹🌹