Sangli Samachar

The Janshakti News

गृहखात्याची प्रतिमा उंचावण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर; संतोष पाटील यांचा आरोप !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० ऑक्टोबर २०२४
पुण्यातील सरकारी हॉस्पिटलमध्ये झालेले ड्रग्स प्रकरण, ड्रग्स वाहतुकीसाठी पोलीस व्हॅनचा वापर, अनेक ठिकाणी सापडलेल्या ड्रग्स बनवण्याचे कारखाने, राज्यात होत असलेले बलात्कार, महिला व मुली, सुरक्षित नसणे, वारकऱ्यावर केलेला लाठीचार्ज, मराठा आंदोलनाकावर केलेला लाठीचार्ज. शांततामय पुणे शहरात घडवून आणलेली कोयता गॅंग, गॅंग रेप, गुंडांचे उदात्तीकरण, कैद्यामार्फत ड्रग्स सप्लाय या सर्व कारणामुळे राज्यातील गृह खात्याची अब्रू राज्याच्या वेशीवर टांगली आहे व त्यामुळे पोलिसांची डागाळलेली प्रतिमा जनतेसमोर उंचावण्यासाठी या सर्व गोष्टीचा परिणाम येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत होऊ नये, म्हणून बदलापुरात बलात्कारकांड घडवण्यात आले. असा आरोप प्रवक्ते संतोष पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.


बदलापूर येथील ही शाळा आरएसएसचे पदाधिकारी ही शाळा चालवत आहेत त्यामध्ये असलेले आपलेच विश्वस्त बघूनच ही शाळा निवडण्यात आली. सामान्य नागरिकांना याची शंका येऊ नये, म्हणून अक्षय शिंदेला या शाळेच्या विश्वस्ताने हाताशी धरून शाळेतील काही मुलींना पॉर्न व्हिडिओमध्ये गुंतवून अक्षय शिंदेला बळीचा बकरा करून अडकवले गेले. याची सर्व माहिती अक्षय शिंदेला होती व ती भविष्यात बाहेर येऊ नये व आपल्या शाळेतील ट्रस्टीनी केलेला किळसवाणा, घाणेरडा प्रकार जगाच्या समोर येऊ नये म्हणून अक्षय शिंदेचा गृहमंत्र्याच्या आदेशानेच एन्काऊंटर करण्यात आला. असे संतोष पाटील यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

राज्यातील गृह खात्याला झालेल्या बदनामीतून बाहेर काढण्यासाठी बदलापुरात शाळेत रचलेले हे भयानक कांड घडविण्यात आले यामधून गृहमंत्री हे कसे पोलिसांचे धर्मवीर आहेत, हेच या घटनेवरून दाखवून देण्यासाठीच, ही घटना घडवून आणली गेली आहे. असे नमूद करून संतोष शिंदे यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सामाजिक कार्यकर्ते व अनेक क्षेत्रात परिपूर्ण व अभ्यास करणारे व एन्काऊंटरचा थरार अनुभव घेतलेले याचिका करते व आर टीआयचे कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. अशा ह्या वाईट व घाणेरड्या राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीला या राज्यातून तमाम लोकांनी दूर ठेवले पाहिजे, नाहीतर या राज्याला बिहार करण्याचा राक्षसी प्रवृत्तीचा डाव जनरल डायर म्हणजेच राज्याचे गृहमंत्री हे सगळं घडवून आणत आहेत, असा आरोप हे संतोष शिंदे यांनी या प्रसिद्धी पत्रकात केला आहे.