Sangli Samachar

The Janshakti News

वृत्तपत्र विक्रेता कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात स्थिरता आणणारा निर्णय - विकास सुर्यवंशी


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ ऑक्टोबर २०२४
वृत्तपत्र विक्रेत्याच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ व्हावे व यामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासह वृत्तपत्र व्यवसायातील सर्वच घटकांचा समावेश करावा या मागणीसाठी आम्ही गेली १५ वर्षे लढा देत आहे. अखेर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आम्हाला न्याय दिला असल्याचे, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सरचिटणीस श्री. विकास सूर्यवंशी यांनी एका प्रसिद्धी पत्रकामध्ये नमूद करून सर्वांचे आभार मानले आहेत.

या प्रसिद्धीपत्रकात, श्री. विकास सूर्यवंशी यांनी पुढील म्हटले आहे की, आमच्या या संपूर्ण लढ्यामध्ये ठाणे येथील आमदार संजय केळकर यांनी आम्हाला मोलाची साथ दिली त्याबद्दल त्यांचेही आभार. याशिवाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, हसन मुश्रीफ, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार प्रवीण दरेकर, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार आशिष शेलार, राजेश क्षीरसागर आदी मान्यवरांसह राज्यातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांचे मालक, संपादक यांचे योगदान लाभले त्याबद्दल आभार. सर्वाचे गेली पंधरा वर्षे आम्ही हा लढा लढत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वृत्तपत्र विक्रेता एजंट बांधवांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला साथ दिली. या मागणीसाठी वेळोवेळी करण्यात आलेली आंदोलने, मेळावे यासह इतर उपक्रमांमध्ये सर्वांनी ताकतीने साथ दिली त्यामुळेच हे यश मिळू शकले. 


वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करून या माध्यमातून वृत्तपत्र विक्रेत्यांच्यासाठी कोणत्या योजना राबवाव्यात, या कल्याणकारी मंडळासाठी निधी कसा उभा करता येईल, याबाबतचा अहवाल यापूर्वीच सरकारला सादर करण्यात आलेला आहे. लवकरच पुढील प्रक्रिया सुरू होऊन, या कल्याणकारी मंडळाचे लाभ प्रत्यक्षात मिळण्यास सुरुवात होईल यासाठी आम्ही अधिक ताकतीने प्रयत्न करणार आहोत. असे असे असे श्री. विकास सूर्यवंशी यांनी या प्रसिद्ध पत्रकार नमूद केले आहे.