yuva MAharashtra मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवराज काटकर यांचा आज डिजिटल मीडिया परिषदेतर्फे सत्कार !

मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवराज काटकर यांचा आज डिजिटल मीडिया परिषदेतर्फे सत्कार !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १६ ऑक्टोबर २०२४
मराठी पत्रकार परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षपदी अभिनंदन निवड झाल्याबद्दल, सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ व सांगली जिल्हा डिजिटल मीडिया परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली येथील ज्येष्ठ पत्रकार शिवराजदादा काटकर यांचा सत्कार होत आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन, सांगली जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष श्री. अविनाश कोळी सांगली जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री. कुलदीप देवकुळे यांनी केले आहे.

श्री शिवराज काटकर यांनी यापूर्वी मराठी पत्रकार संघटनेचे सदस्य म्हणूनही अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली आहे. पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी आग्रहकाने प्रत्येक पातळीवर बुलंद आवाज निर्माण करणारा 'आपला माणूस' म्हणून शिवराजदादा काटकर यांचा राज्यात मोठा दबदबा आहे. विशेषतः पत्रकारांवरील होणारी हल्ले रोखण्यासाठी केंद्र सरकारला कायदा करण्यासाठी जी आंदोलने झाली, त्यामध्ये श्री. काटकर यांनी हिरीरीने भाग घेतला होता. त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी पत्रकारावर हल्ले झाले तेव्हा दडपशाहीचा प्रकार घडला, त्या त्या प्रत्येक ठिकाणी त्यांनी आंदोलन करून संबंधित पत्रकाराला न्याय मिळवून देण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला आहे.


गणपती मंदिर परिसरातील हीच हायनेस विजयसिंह राजे पटवर्धन हॉल येथे आज 16 ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजता सत्कार कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील सर्व माध्यमांचे प्रतिनिधी, पत्रकार, प्रेस फोटोग्राफर, त्याचप्रमाणे साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय, औद्योगिक, क्रीडा, सहकार, प्रशासकीय अशा सर्वच क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी या समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन, श्री अविनाश कोळी व श्री कुलदीप देवकुळे यांनी केले आहे.