Sangli Samachar

The Janshakti News

सांगली येथील ज्येष्ठ पत्रकार व शिक्षक महादेव केदार ऑनररी डॉक्टरेट पदवीने सन्मानित !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १४ ऑक्टोबर २०२४
येथील ज्येष्ठ पत्रकार तथा श्रीमती शालिनी रंगनाथ दांडेकर हायस्कूल यशवंतनगर सांगलीचे शिक्षक महादेव केदार हे शिक्षक युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, न्यूयॉर्क राज्य तथा आंतरराष्ट्रीय राज्य संस्थेच्या मान्यतेने आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संरक्षण आयोगा (World Human Rights Protection Commission) च्या शिफारशीनुसार ऑनररी डॉक्टरेट पदवीने नुकतेच सन्मानित करण्यात आले.

महादेव केदार यांनी शिक्षण क्षेत्रातील राबविलेले विविध उपक्रम, कोरोना काळात केलेले सामाजिक कार्य, रक्तदान शिबिराचे आयोजन, गरजूंची केलेली निःस्वार्थ सेवा, सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान, इन्साफ फाउंडेशनचे मुस्तफा मुजावर यांच्याबरोबर केलेली बेघरांसाठीची सेवा आणि समाज प्रबोधन कार्यात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विश्व मानवाधिकार आयोगाकडून ऑनररी डॉक्टरेट पदासाठी निवड केली होती. 


ही पदवी भारत सरकारच्या योजना आयोग, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, भारत सरकार आणि भारत सरकारच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (approved by ministry of corporate affairs, government of India and government of Indian ministry of skill development and Entrepreneurship) यांच्या मान्यतेने देण्यात येते. तसेच हे प्रमाणपत्र जगभरातील सामाजिक कार्याच्या विकासासाठीच्या त्यांच्या बांधिलकीची ओळख म्हणून सदस्यत्वाचे प्रमाणपत्र देखील देते.


जागतिक दर्जाचा हा ऑनररी डॉक्टरेट पदवीप्रदान समारंभ चाणक्यपुरी, दिल्ली येथील पंचकारांकित हॉटेल अशोकामध्ये झाला. फिटनेस मंत्राची सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, भारताचे मा. वस्त्रोद्योग मंत्री सय्यद शहनवाज हुसेन, खासदार मनोज तिवारी, मा.माहिती प्रसारण तथा क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, ट्रिपल महाराष्ट्र केसरी तथा पोलीस उपाधीक्षक पै. नरसिंग यादव, अर्जुन अवार्ड विजेती भारतकुमारी नेहा राठी यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.