Sangli Samachar

The Janshakti News

टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याला स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांचे नाव देण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा !



| सांगली समाचार वृत्त |
विटा  - दि. २ ऑक्टोबर २०२४
स्व. अनिलभाऊ बाबर यांचे नाव घेतल्याशिवाय टेंभू योजना पूर्ण होऊ शकत नाही असे सांगत, टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याला अनिल भाऊ बाबर यांचे नाव देऊ, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विटा येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना केली. अनिलभाऊ बाबर यांच्याशिवाय टेंभू योजनेचे भूमिपूजन करावे लागेल असे वाटले नव्हते त्यांचे या योजनेतील योगदान कुणालाही विसरता येणार नाही, असे गौरवोद्गारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी सर्व सामान्यांच्या मनातील सरकार आणण्याचा आम्ही निर्णय घेतला त्यावेळी एक दोन नव्हे तर 50 आमदार माझ्या पाठीमागे उभे राहिले. यानंतर सरकार देखील स्थापन झालं. आमच्या बंडाची जगभरातील 32 देशांनी दखल घेतली आहे. परंतु 'गड आला पण सिंह गेला' अशी परिस्थिती अनिलभाऊंच्या निधनानंतर आमची झाली आहे.


लाडकी बहीण योजना बंद होणार नाही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही ही योजना आखली नाही सर्वसामान्य कुटुंबातील महिलांच्या जीवनात बदल झाला पाहिजे हा हेतू ही योजने राबवण्यामागे आमचा हेतू आहे. ही योजना राबवत असताना इतर कुठल्याच योजनांच्या बाबतीत सरकार हात आखडता घेणार नाही. जेव्हा बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांच्या विचारांशी तडजोड होऊ लागले तेव्हा मी सत्तेतून पाय उतार झालो असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्यांचे सरकार या राज्यात काम करीत आहे असे म्हटले.

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या आणि पैशातून लोळणाऱ्या लोकांनीच मुख्यमंत्री झालं पाहिजे असे काही आहे का ? असा समान करून मुख्यमंत्र्यानी म्हटले की, सरकार स्थापन झाल्यापासून आज पडेल उद्या पडेल अशी वेगवेगळी भाकिते विरोधकांनी केली परंतु अजूनही आमचे सरकार पडले नाही. जनतेनेच त्यांची सर्व मनसुबे धुळीस मिळवले आहेत, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

माझ्या हेलिकॉप्टर दौऱ्यावर टीका होते मी काय ? एकाच दिवसात मला अनेक किलोमीटरचा प्रवास करावा लागतो हा प्रवास मी काय कारणने करू का ? असा संवाद आहे मुख्यमंत्री यांनी यावेळी केला. आठ तासात मी दहा हजार फायलीवर सह्या करतो. लाडकी बहीण, लाडके भाऊ आणि ज्येष्ठ नागरिक माझ्या पाठीशी आहेत तोवर मला काहीही चिंता नाही. लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय सरकार गप्प बसणार नाही. मात्र आपण सावत्र भावापासून सावध रहा, लाडकी बहीण योजनेत थोडा जरी थोडा घातला तरी कोल्हापुरी जोडा दाखवा, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना लगावला.