Sangli Samachar

The Janshakti News

सांगली जिल्हा पोलीस दलाने राज्यात मिळवला प्रथम क्रमांक, सर्वत्र कौतुकाचा वर्षाव !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २४ ऑक्टोबर २०२४
अप्पर पोलीस महासंचालक गुन्हे अन्वेषण विभाग पुणे यांचे कडून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सी सी टी एन एस (क्राईम अँड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क सिस्टीम) (गुन्हा आणि गुन्हेगार तपास जाळे प्रणाली) संगणक प्रणाली कार्यरत आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभाग द्वारे प्रत्येक महिन्यात सीसीटीएनएस प्रणालीच्या कामगिरीचा राज्यस्तरीय घटक निहाय आढावा घेण्यात येतो. माहे ऑगस्ट 2024 मध्ये या प्रणालीच्या राज्यातील 53 घटकांच्या मासिक कामगिरीचे मूल्यांकन केले असता, यामध्ये सांगली जिल्हा सन 2020 मध्ये सातत्य राखत पहिल्या तीन क्रमांका मध्ये आहे. दैनंदिन प्रभावी वापरामध्ये व अचूकता राखण्यात अद्ययावत माहिती भरण्यात, नागरिकांच्या तक्रारी इत्यादी बाबत जलप गतीने निर्गती केल्याबद्दल सांगली जिल्हा पोलीस दलाने राज्यात 98.1% गुण मिळवून ऑगस्ट महिन्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे.

नागरिकांना कोणत्याही प्रकारे सुविधा होणार नाही तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे सर्व कामकाज हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करून सर्व कामकाज हे ऑनलाईन पद्धतीने करण्यावर विशेष भर देण्याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख श्री. संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, यांनी सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना वेळोवेळी केलेले मार्गदर्शन व सूचना दिल्या होत्या. 


याच अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस दलाने उत्कृष्ट कामगिरी करीत राज्यात सर्वाधिक गुणप्राप्त करून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. यापूर्वी देखील चांगली जिल्ह्यांनी तंत्रज्ञान आधारित पोलिसी करीत कामात सातत्य ठेवून मार्च 2024 मध्ये प्रथम क्रमांक, जून 2024 मध्ये द्वितीय क्रमांक, जुलै 2024 मध्ये तृतीय क्रमांक मिळविला आहे आता ऑगस्ट 2024 मध्ये अशीच कामगिरी आणि यश प्राप्त करीत प्रथम क्रमांक पटकाविला आहे.

याबाबत जिल्हा पोलीस प्रमुख श्री. संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर (नोडल ऑफिसर सीसीटीएनएस प्रणाली सांगली) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अफरोज पठाण, पोहे को नितीन महादेव बरगाले, म पो ना सलमान इनामदार, यांनी विशेष परिश्रम घेऊन सीसीटीएनएस प्रणालीच्या कामकाजावर बारीक लक्ष ठेवले होते. वेळोवेळी जिल्ह्याच्या कामकाजाचा आढावा हे घेतला होता तसेच सीसीटीएनएस प्रणालीचे कामकाजात येणाऱ्या अडचणीवर अतिशय चांगल्या प्रकारे उपाययोजना करून संबंधित प्रणालीचे कामकाज करणाऱ्या अधिकारी व अंमलदार यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. याचमुळे सीसीटीएनएस कार्यप्रणालीमध्ये सांगली जिल्हा पोलीस दलाने उत्कृष्ट कामगिरी करून माहे ऑगस्ट 2024 मध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे याकरिता त्यातील सीसीटीएनएस प्रणाली संबंधाने कर्तव्य करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर (नोडल ऑफिसर सीसीटीएनएस प्रणाली सांगली) यांनी अभिनंदन केले आहे. पोलीस दलाच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.