Sangli Samachar

The Janshakti News

सांगलीतील महापालिका शाळा नं. २९ मधील शिक्षकेने चौथीतील विद्यार्थ्यांना दिला बेदम चोप, संबंधितावर कारवाईची मागणी !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १९ ऑक्टोबर २०२४
सांगली येथील पंचशील नगर मधील महापालिका शाळा नंबर 29 मधील इयत्ता चौथीतील बाल व निरागस विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण प्रकरणी सखोल चौकशी करून, महापालिका प्रशासनाने कठोर कारवाई आणि फौजदारी दाखल करावी, अशी मागणी शहर व नागरी विकास म्हणजेच संघटक डॉ. कैलास पाटील यांनी सांगली महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महापालिकेच्या शाळा नंबर 29 मधील इयत्ता चौथी मध्ये शिकणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना 17 ऑक्टोंबर रोजी एका शिक्षक व शिक्षिकेने विनाकारण अमानुष मारहाण केली आहे. त्यामुळे शाळेत जाणारी मुले भयभीत झाली असून, ती मानसिक तणावाकडे वावरत आहेत. सदरील मुळे शाळेत जाण्यास तयार नाहीत. बाल व निरागस मुलांना झालेले मारहाण व घटनेचा प्रकार अतिशय निंदनीय असून, त्याचा या बालकांच्या मनावर अतिशय वाईट परिणाम होत आहे. नवीन शैक्षणिक धोरण आणि शासन निर्देश व बालहक्क आयोग मधील तरतुदीनुसार कोणत्याही बालकास मारहाण करणे कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे या महाराणा प्रकरणे सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी संबंधित पालकांनी व नागरिकांनी केली आहे.


डॉ. कैलास पाटील यांनी दिलेल्या निवेदनावर आकाश माने, ॲड. डॉ. सुनिता पाटील भानुदास पाटील, देवजी साळुंखे, भानुदास हुबाले, आदींच्या सह्या आहेत.