Sangli Samachar

The Janshakti News

केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात बडतर्फ लष्करी जवानाकडून अनोखे भीक मांगो आंदोलन !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ ऑक्टोबर २०२४
लष्करातून निवृत्त झाल्यानंतर जवानांना विविध शासकीय कार्यालयातून सामावून घेतले जाते. त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्रातील या जवानांना नोकरीची मोठी संधी असते. परंतु धुळे जिल्ह्यातील बोर विहीर गावचे रहिवासी असलेले चंदू चव्हाण यांच्यावर नोकरी नसल्याने सध्या उपासमारीची वेळ आल्याने, त्यांनी धुळे येथे केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात गळ्यात सरकारच्या निषेदाची पाठी अडकवून न्यायाची भीक मागणारे आंदोलन सुरू केले आहे. सध्या धुळे शहरात याच आंदोलनाचे चर्चा सुरू आहे.

चंदू चव्हाण हे धुळे शहरातील विविध राजकीय पक्षांच्या कार्यालयात आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यासाठी गेली अकरा वर्षे हेलपाटे घालत आहेत. मात्र त्यांची कोणीही दखल घेतली नाही. त्यांना केंद्र व राज्य सरकारने शासकीय नोकरीत सामावून घेतले नाही. त्यांना लष्कराची पेन्शनही मिळत नाही. आणि म्हणूनच आपल्यावर उपासमारीची वेळ आल्याने चंदू चव्हाण हे अशा अनोख्या आंदोलनातून रस्त्यावर उतरले आहेत. विशेष म्हणजे सैन्यातील जवानाच्या ड्रेस कोड मध्येच न्यायासाठी भीक मांगो आंदोलन करीत नागरिकांचे लक्ष वेधत आहेत.


याबाबत अधिक चौकशी करता अशी माहिती मिळाली की, त्यांना अटक केली व तीन महिन्याच्या कारावासानंतर चंदू चव्हाण यांची सुटका करण्यात आली. भारतात आल्यानंतर भारतीय लष्कराने चंदू चव्हाण यांच्या विविध चौकशी केल्या होत्या. परंतु या चौकशी दरम्यान त्यांच्याकडून कोणतीही समाधानकारक माहिती न मिळू शकल्याने तसेच त्यांना नोकरीतून बडतर्फ करण्यात आले होते. मात्र यावेळीही चंदू चव्हाण यांनी अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे आपल्याला बडतर्फ करण्यात आल्याचा आरोप केला आहे. आता चंदू चव्हाण यांची बाजू खरी की, लष्कराने त्यांच्यावर केलेली कारवाई खरी, याबाबत अधिकृतरित्या कोणतीही माहिती मिळू शकली नाही.