| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. ११ ऑक्टोबर २०२४
सध्या राज्यात एका मागून एक महिला, तरुणी, व अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. या प्रकरणाने राज्यातील वातावरण कलुषित झाले असून पोलीस यंत्रणा व राज्य शासनावर समाज माध्यमातून जोरदार टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात पुण्यातील बोपदेव घाटात झालेल्या सामुहिक अत्याचार प्रकरणाचे पडसाद पूर्ण राज्यात उमटले होते. 'उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संशयितांचा दिसेल तिथे एन्काऊंटर करा' असा वार्ताही प्रसिद्ध झाल्या होत्या.
दरम्यान फरार झालेल्या या तिघा गुन्हेगारांच्या तपासासाठी राज्यभरातील पोलीस डोळ्यात तेल घालून शोध घेत होते. अगदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचाही यामध्ये वापर करण्यात आला. पोलिसांचे पथके राज्यभरात आरोपींचा शोध घेत होते. अखेर सीसीटीव्ही फुटेज च्या माध्यमातून पोलिसांनी आरोपींचा माग काढला असून, समोर आलेल्या माहितीनुसार यातील आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. या तिघांपैकी दोघांवर कोंढवा पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा दाखल झाला आहे. आता पोलिसांनी यापैकी एकाला ताब्यात घेतला आहे तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
आठवड्याभरापूर्वी पुण्यातील बोपदेव घाटात आपल्या मित्रासोबत फिरण्यासाठी आलेल्या एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला होता. ज्याच्या सोबत ती फिरण्यास आली होती त्याला मारहाण करून, त्याच्याकडील चीजवस्तू काढून घेण्यात आल्या होत्या. दरम्यान ज्या आरोपीला पकडण्यात यश आले आहे, त्याच्याकडून इतर गुन्हेगारांचे नावे समोर आली आहेत. त्यानुसार इतर दोघांना गुन्हेगारांना नागपूर येतोय ताब्यात घेण्यात आले असून त्यांना पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.