| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ६ ऑक्टोबर २०२४
सध्या महाराष्ट्र शासन विविध लोकप्रिय योजनांच्या माध्यमातून मतदारांना एका हाताने भरभरून दान देत असतानाच दुसऱ्या हाताने काढून घेत असल्याचे प्रकार दररोज उघडकीस येत आहेत. आता महाराष्ट्र शासनाने शिक्षण मंडळाच्या माध्यमातून पालकांच्या खिशाला हात घातला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी केली शिक्षण म्हणून परीक्षा शहरात वाढ करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे कागद भागल्यामुळे यंदापासून दहावी आणि बारावीच्या परीक्षेत तब्बल 12 टक्के वाढ केली जाणार आहे. आधीच बाजारातील अनेक वस्तू महागल्या आहेत. आता विद्यार्थी विद्यार्थिनींना शिक्षणाच्या माध्यमातून दिशा देणाऱ्या परीक्षा शुल्काची वाढ केल्याने पालकातून नाराजी व्यक्त होत आहे.
या निर्णयानुसार आता दहावीच्या विद्यार्थ्यांना 470 रुपये तर बारावीच्या विद्यार्थ्यांकडून 490 रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे. शिक्षण मंडळाकडून याबाबत एक प्रसिद्धी पत्रक जारी करून आणण्यात आले असून, यामध्ये म्हटले आहे ते दरवर्षी विद्यार्थ्यांचे संख्या वाढत आहे त्याचप्रमाणे कागदाच्या दरातही वाढ होत आहे तसेच परीक्षेच्या निमित्ताने तदनुषंगिक खर्चातही वाढ होत आहे. त्यामुळे ना इलाजाने ही परीक्षा शुल्क वाढ करण्यात या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.परीक्षा शंका बरोबरच प्रशासकीय शुल्क, प्रमाणपत्र शुल्क आणि प्रात्यक्षिक परीक्षा शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. याचा थेट फटका आता पालकांना बसणार आहे. विद्यार्थी विद्यार्थिनींच्या पुढील शैक्षणिक आयुष्यासाठी दहावी बारावीची परीक्षा अत्यंत महत्त्वाचे असते. यासाठी राज्यभरातून लाखो विद्यार्थी विद्यार्थी ही परीक्षा देत असतात.
दरम्यान फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये होणाऱ्या, बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून एक ते 30 ऑक्टोबर पर्यंत नियमित स्वीकासह विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत असे माहिती मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.