yuva MAharashtra सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा खर्च निरीक्षकांकडून आढावा !

सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील निवडणूक कामकाजाचा खर्च निरीक्षकांकडून आढावा !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २५ ऑक्टोबर २०२४
निवडणूक आयोगाकडून जिल्ह्यातील 8 केंद्रीय केंद्रीय विधानसभा मतदारसंघाअंतर्गत खर्च विषयक बाबींच्या निरीक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक खर्च निरीक्षक करणी दान व बुरा नागा संदीप यांनी निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला. कवठेमहांकाळ - तासगाव, विटा, जत आणि पलूस – कडेगाव मतदारसंघांसाठी खर्च निरीक्षक बुरा नागा संदीप (आय. आर. एस.) सी व सीई व सांगली, मिरज, वाळवा, शिराळा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी खर्च निरीक्षक म्हणून करणी दान (आय.आर.एस.) यांची नियुक्ती मा. भारत निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, खर्च नियंत्रण समितीचे नोडल अधिकारी शिरीष धनवे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, जिल्हास्तरीय समित्यांचे नोडल अधिकारी प्रत्यक्षात आणि सर्व विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.


निवडणुकीसाठी नियुक्त सर्व यंत्रणांनी मा. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे काटेकोरपणे दिलेली जबाबदारी पार पाडावी. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची प्रक्रिया जिल्ह्यात शांततेत, निःपक्षपातीपणे, भयमुक्त वातावरणात व पारदर्शकपणे पार पाडण्यास व आदर्श आचारसंहितेची जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी परस्पर समन्वय ठेवावा. सर्व पथकांनी सतर्क राहावे, असे खर्च निरीक्षक करणी दान व बुरा नागा संदीप यांनी यावेळी सूचित केले.

जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले, आठही मतदारसंघात मतदारसंघनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, एफएसटी, एसएसटी, व्हीडिओ सर्वेक्षण पथक (व्हीएसटी), व्हीडिओ पाहणी पथक (व्हीव्हीटी) पथकातील सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना प्रशिक्षणही देण्यात आले असून दिलेल्या जबाबदारीप्रमाणे आपापल्या मतदारसंघात कामे करीत आहेत. या आढावा बैठकीत निवडणूक खर्च निरीक्षकांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल, याबाबत सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी, असेही डॉ. राजा दयानिधी यांनी सूचित केले.

यावेळी शिरीष धनवे यांनी जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदार संघांतील कार्यवाहीचा आढावा संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून सादर केला.