Sangli Samachar

The Janshakti News

केवळ शर्टाची कॉलर शिवून ही गृहलक्ष्मी कमावते महिन्याला तीस हजार रुपये, नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर माहितीचे पुष्प !



| सांगली समाचार वृत्त |
कुंबमचेनी - दि. ६ ऑक्टोबर २०२४
सध्या सर्वत्र नवरात्रीची धामधूम सुरू आहे. दुर्गा मातेच्या नऊ रूपांची पूजा या निमित्ताने संपूर्ण देशात होत असते. महिला वर्ग मोठ्या संख्येने उत्साहाने या उत्सवात सहभागी होत आहे. भारतीयांसाठी गृहलक्ष्मी अर्थात सौभाग्यवती तितकीच महत्त्वाची... ही गृहलक्ष्मी अर्थात महिला आपल्या कुटुंबाच्या उन्नतीसाठी कष्ट करून धनलक्ष्मीला प्राप्त करीत असतात.

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील कुंबमचेनी येथील अशाच एका गृहलक्ष्मीची ही ओळख... तामिळनाडूत तयार कपडे शिवण्याची मोठी इंडस्ट्री आहे. कुंबमचेनी येथील उत्पादित तयार कपडे देशातील विविध राज्यात तसेच परदेशातही पाठवले केले जातात. या गारमेंट कापण्या परिसरातील महिलांना उत्पन्नाची संधी निर्माण करून देत असतात. अशा अनेक महिलांपैकी शाजिरा परवीन ही महिला. 

कुंबमचेनी येथील शर्टची कॉलर तसेच कॅनव्हासेस त्याच प्रमाणे इतर आवश्यक भाग तयार करून जिल्ह्यातील अनेक मोठ्या तयार कपडे शिवणाऱ्या कारखान्यांना पुरवत असतात. ज्यामधून त्यांना महिन्याला तीस हजार रुपयांची कमाई होत असते. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाला लावण्यासाठी शाजिरा या कामाच्या शोधात होत्या. परंतु अल्पशिक्षणामुळे त्यांना नोकरी मिळत नव्हती. अन्य पर्यायाच्या शोधात असताना त्यांच्या लक्षात आले की, जिल्ह्यातील अनेक तयार कपडे शिवणाऱ्या कंपन्या महिलांना, घरी शिवण्यासाठी काही काम देत असतात.


शाजिरा या जवळच्या एका कपडे शिवणाऱ्या फॅक्टरी पोहोचल्या आणि त्यांनी कॉलर व कॅनवास शिवण्याचे काम मिळवले. सुरुवातीस काही अडचणी आल्या. परंतु त्यावर करीत त्यांनी केवळ स्वतःच्याच नव्हे, तर परिसरातील इतर कुटुंबातील महिलांनाही काम दिले. सध्या शाजिरा यांचा स्वतःचा कारखाना असून, यामध्ये अनेक महिला काम करत असतात.

सध्याच्या काळात नोकरी महिलांना विशेषतः तरुणींसाठी कामाच्या ठिकाणी जाणे येणे असुरक्षित बनले आहे. केवळ सरकारीच नव्हे तर खाजगी ऑफिसेस व नोकरीच्या ठिकाणी महिलांचे शोषण केल्या जात असलेल्या पार्श्वभूमीवर शाजिरा परवीन या, इतर महिला व  तरुणींसाठी एक आदर्श उदाहरण ठरावे.