| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १३ ऑक्टोबर २०२४
नुकतेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीवासी झालेले मुंबईतील दिग्गज नेते, बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचे नेमके कारण लक्षात आले नसले तरी, या हत्येत विष्णोई गँगचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. सिद्दिकी आणि सलमान खान यांचे संबंध बॉलीवूडसह राजकीय क्षेत्रातील तसेच सर्वसामान्यांना आहेत. सिद्दिकी यांची इफ्तार पार्टी हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. यामध्ये सलमान खान, शाहरुख खान यांच्यासह, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि मुस्लिम धर्माचे अनेक मोठ्या नेत्यांचे हजेरी असते.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीपैकी एक जण हरियाणाचा तर दुसरा उत्तर प्रदेश येथील आहे. ऐन दसऱ्याच्या दिवशी इतक्या मोठ्या गर्दीत हत्या करण्याचे धाडस आरोपीनी केले आहे. त्यामुळे या हत्येमागे मोठी शक्ती शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या एक महिन्यापासून बाबा सिद्दिकी यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या जवळपासच्या कोणा व्यक्तीचा समावेश आहे का ? याबाबत पोलीस तपास करीत आहेत.
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर रिवॉल्हरमधून तीन फैरी झाडण्यात आल्या. यापैकी दोन गोळ्या सिद्दिकी यांच्या छातीत घुसल्या होत्या. तर एक गोळी त्यांच्या बाजूला असलेल्या इसमास लागली. रिक्षातून आलेले हल्लेखोर गोळीबार केल्यानंतर पळून जात असताना, या परिसरात बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. तर दोघेजण गर्दीचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.
आता हल्ल्यामागे असलेले कनेक्शन आणि कारण शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर असून, सर्व बाजूंनी शक्यता पडताळून पाहण्यात येत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मुंबईतील कायदा व्यवस्था नाही. तसेच कोणत्याही गॅंगला पुन्हा डोके वर काढू दिले जाणार नाहीत. पोलिसांना याबाबत सक्त सूचना करण्यात आल्या असून, कोणाचाही मुलाहिजा न करता, आरोपींना कडक शासन झाले पाहिजे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.