yuva MAharashtra विजयनगर मध्ये सहकार तपस्वी गुलाबराव पाटील स्मृती उद्यान भूमीपूजन व कोनशिला अनावरण संपन्न !

विजयनगर मध्ये सहकार तपस्वी गुलाबराव पाटील स्मृती उद्यान भूमीपूजन व कोनशिला अनावरण संपन्न !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १४ ऑक्टोबर २०२४
माजी खासदार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष, सांगलीचे माजी नगराध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे माजी चेअरमन स्व. गुलाबराव पाटील यांच्या नावाने विजयनगरातील त्रिमूर्ती व दयानंद हौसिंग सोसायटीच्या खुल्या भूखंडावर पृथ्वीराज पाटील यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नाने मंजूर झालेल्या 'सहकार तपस्वी गुलाबराव पाटील स्मृती उद्यानाचा भूमीपूजन व कोनशिला अनावरण खासदार विशालदादा पाटील यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी पृथ्वीराजबाबा पाटील होते. जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीवहिनी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. विजयनगर मधील त्रिमूर्ती व दयानंद हौसिंग हौसिंग सोसायटीच्या ३० गुंठे ओपन स्पेस वर हे उद्यान विकसित होत आहे. 

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक मुनीर मुल्ला यांनी केले. आर्किटेक्ट प्रमोद परीख यांनी स्मृती उद्यानाचा आराखडा स्पष्ट करताना सिंथेटिक ट्रॅक, हाॅल, लाॅन इ. सुविधा उपलब्ध करण्यात येतील असे सांगितले. 


यावेळी श्रीमती जयश्रीताई पाटील म्हणाल्या, 'सहकार तपस्वी माजी खासदार गुलाबराव पाटील यांच्या नावाने होत असलेले उद्यान हे चांगलेच होणार व विजयनगर भागातील नागरिकांना विशेषतः जेष्ठ नागरिक व लहान मुले आणि महिला यांना उपयोगी पडेल. या चांगल्या कार्याबद्दल मी पृथ्वीराजबाबांना धन्यवाद देते. 

पृथ्वीराज पाटील म्हणाले, 'सहकार तपस्वी गुलाबराव पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या भरीव कामगिरीची नोंद घेऊन शासनाने एक कोटी छत्तीस लाख मंजूर केले आहेत. संपूर्ण उद्यान विकसित करण्यासाठी सुमारे पाच कोटीचा निधी आवश्यक आहे. या उद्यानाचा लाभ सबंध विजयनगर, वानलेसवाडी व प्रभाग क्र.८ मधील नागरिकांना याचा लाभ मिळणार असून अद्यावत अशा प्रकारचे हे गुलाबराव पाटील स्मृती उद्यान जिल्ह्यातील पहिलेच उद्यान आहे. सिंथेटिक ट्रॅक, हाॅल, जिम व हिरवळ आणि झाडी यामुळे आल्हाददायक वातावरण असेल.'


यावेळी माजी नगरसेवक संजय औंधकर, सदाशिव पाटील, राजेंद्र कुंभार कुलकर्णी काका व गोखले सरांनी स्व. गुलाबराव पाटील यांच्या भरीव कामगिरीचा उल्लेख करुन त्यांच्या नावाने विजयनगर भागातील व प्रभाग क्र. ८ मधील नागरिकांसाठी स्मृती उद्यान निर्माण करुन नागरिकांची चांगली सोय होत असल्याबद्दल पृथ्वीराज पाटील यांचे आभार मानले. 


यावेळी ऋतुराज पाटील, माजी नगरसेवक सोनल सागरे , राजेंद्र कुंभार ,संजय औंधकर, सुभाष चिकोडीकर,नितीन मिरजकर, अजित दुधाळ, अजित खरात, बिपीन कदम, प्रा. एन.डी.बिरनाळे, सनी धोतरे, अशोकसिंग रजपूत, इसाक मुल्ला, अजय देशमुख, प्रशांत देशमुख,महावीर पाटील,विक्रम कांबळे, मनोज लांडगे, विशाल सरगर, गोखले सर, कुलकर्णी काका,पृथ्वीराज चव्हाण, सौ. संगिता चव्हाण, बाबगोंडा पाटील, अशोकसिंग रजपूत, सौ. भारती व दीक्षितकुमार भगत,बी.जी. मुलाणी,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनिल पाटील, आर्किटेक्ट प्रमोद परीख,काँटॅक्ट्रर अभिषेक पाटील, आयुब निशाणदार,आशिष चौधरी, प्रशांत अहिवळे व कार्यकर्ते उपस्थित होते.