| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३ ऑक्टोबर २०२४
केंद्र शासनाच्या 'स्वच्छता हीच सेवा अंतर्गत स्वच्छता पंधरवडा' साजरा करण्यात आला. या स्वच्छता पंधरवड्याची काल 2 ॲक्टोबर दिनी सांगता करण्यात आली.
या सांगता कार्यक्रमानिमित्त शास्त्री चौक ते दूरदर्शन केंद्राचा परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये महापालिकेच्या सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. या स्वच्छता पंधरवड्यात महापालिकेकडून एकूण 12 महत्त्वाच्या ठिकाणी स्वच्छता मोहिमा घेऊन स्वच्छता करण्यात आली. याबरोबर स्वच्छता हीच सेवा अंतर्गत जनजागृती सायकल रॅली, महा स्वच्छताअभियान, टाकावू पासून टिकावू अंतर्गत स्थळ सुशोभीकरण स्पर्धा, स्वच्छता मित्र पुरस्कार, ब्रँड ॲम्बेसेडर नियुक्ती कार्यक्रम तसेच स्वच्छता संदेश देणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्वच्छता पंधरवड्याची बुधवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी सांगता झाली. यानिमित्त दूरदर्शन केंद्र परिसरात आयोजित कार्यक्रमात स्वच्छता पंधरवड्यात उल्लेखनीय काम केलेल्या स्वच्छता कर्मचारी, महिला कर्मचारी आणि वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक यांचा आयुक्त शुभम गुप्ता यांच्याहस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास उपायुक्त वैभव साबळे, उपआयुक्त विजया यादव, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा चिदानंद कुरणे, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, मालमत्ता व्यवस्थापक धनंजय हर्षद, सहायक आयुक्त अनिस मुल्ला, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, जलनि:सारण अभियंता तेजस शहा, विशेष कार्य अधिकारी सुनील पाटील, स्वच्छ सर्व्हेक्षण शहर समन्वयक वर्षाराणी चव्हाण, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनूस बारगीर, अनिल पाटील
यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्वच्छता हीच सेवा उपक्रमा अंतर्गत सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महापालिकेचे ब्रँड अँबेसिडर व पत्रकार दीपक चव्हाण यांनी केले.