Sangli Samachar

The Janshakti News

माजी खासदार संजय काका पाटील अजित दादांच्या दरबारात, चिरंजीवांच्या उमेदवारीसाठी घातले साकडे !


| सांगली समाचार वृत्त |
तासगाव - दि. १९ ऑक्टोबर २०२४
कवठेमंकाळ तासगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पाटील यांच्या विरोधात प्रभाकर पाटील या आपल्या चिरंजीवांना उतरवण्यासाठी माजी खासदार संजय काका पाटील हे प्रयत्नशील आहेत. महायुतीतील चर्चेनुसार हा मतदार संघ अजित पवार राष्ट्रवादी घटना देण्याचे संकेत आहेत. त्यामुळे प्रभाकर पाटील यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठी संजय काका हे अजित पवार यांच्या दरबारात दाखल झालेले आहेत.

गत लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्याने माजी खासदार संजय काका पाटील हे विजयासाठी दंड थोपटून उभे राहिले आहेत. परंतु यावेळी तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून माजी उपमुख्यमंत्री तथा या राष्ट्रवादीचे दिवंगत नेते स्व. आर. आर. पाटील व विद्यमान आमदार श्रीमती सुमनताई पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांचे उमेदवारी पक्की मानली जात आहे.

तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात माजी खासदार संजय पाटील व स्व. आर. आर. आ. सुमन पाटील यांच्या गटात पारंपारिक टोकाचे मतभेद आहेत. वेळोवेळी हे गट एकमेकांसमोर इर्षेने उभे ठाकतात. नुकतेच तासगाव येथील नगर परिषदेच्या सभागृह उद्घाटन प्रसंगी याची प्रचिती आली होती. परंतु हा वाद विकोपाला जाण्यापूर्वीच पोलिसांनी आणि उपस्थित पालकमंत्री ना. डॉ. सुरेशभाऊ खाडे व आ. सुमन ताई पाटील यांनी मदतीकडून दोन्ही गटाला शांत केले.


यापूर्वी अनेक वेळा कवठेमहांकाळ तालुक्यात अत्यंतिक वादातून कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोके फोडली होते. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात घामासान होण्याची शक्यता आहे. आणि म्हणूनच सांगली विधानसभा मतदारसंघांत तासगाव कोठे महाकाळ मतदारसंघ हाय व्होल्टेज समजला जातो. आता प्रभाकर पाटील यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळणार का ? आणि मिळाल्यानंतर निवडणूक शांततेत पार पडणार का असा प्रश्न मतदारांना पडला आहे.