Sangli Samachar

The Janshakti News

काळीवाट मार्ग संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने संजयजी बजाज यांचे मानले आभार !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १४ ऑक्टोबर २०२४
हरिपूर ते काळीवाट २.१ कि.मी चा रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार होता. सदर मार्गा दरम्यान हरिपूर मधील ग्रामस्थांच्या शेतजमिनी तसेच प्लॉटधारकांचे प्लॉटस मोठया प्रमाणात बाधित होऊन जवळपास ३ कोटींचे नुकसान हरिपूर ते काळीवाट येथील लोकांचे होणार होते.

स्थानिक नागरिक व शेतकरी यांच्याशी चर्चा न करता त्यांचे आर्थिक नुकसान करून प्रशासनाने हा मार्ग पूर्ण करण्याचा घाट घातला होता. स्थानिक नागरिक शेतकरी यांचा गेल्या ३ वर्षांपासून हा मार्ग रद्द होण्यासाठी प्रशासनाशी संघर्ष सुरु होता.

दरम्यान शिष्ट मंडळानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली शहरजिल्हाध्यक्ष मा. संजय बजाज साहेबांची भेट घेऊन तत्कालीन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री मा.जयंतरावजी पाटील यांना सदरची अन्यायकारक बाब निदर्शनास आणून दिली.

जयंतरावजी पाटील यांनी घटनचे गांभीर्य लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे तसेच स्थानिक नागरिकांचे नुकसान होणार नाही, याची दखल घेत जिल्हा मार्गाचे काम थांबवण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागास देण्यात आले. हरिपूर ते काळीवाट मार्ग संघर्ष समिती तसेच हरिपूर गावातील नागरिकांच्या लढ्याला यश आले.


दिनांक - ९ ऑक्टोंबर २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अप्पर सचिवांनी हरिपूर - काळी वाट जिल्हा मार्ग रद्द करून पुन्हा ग्रामीण मार्ग करण्याचा आदेश पारीत केल्यामुळे नागरिक व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर होणारी आर्थिक हानी टळली.

शासन निर्णय पारित झाल्यामुळे हरिपुरातील नागरिक शेतकरी यांनी या निर्णयाचे स्वागत करीत मोठया प्रमाणात जल्लोष साजरा केला.
यावेळी शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच जयंतराव पाटील तसेच शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज साहेब तसेच युवक शहर जिल्हाध्यक्ष मा.राहुलदादा पवार यांच्या मदतीबद्दल आभार मानले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष सचिन जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे, सरचिटणीस अर्जुन कांबळे, सचिन केंचे, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष फिरोज मुल्ला त्याचबरोबर हरिपूर काळी वाट मार्ग संघर्ष समितीचे सतीश जोग, योगेश आंबी, महावीर वर्धमाने, धोंडीराम रेपे, सुरेश बजाज, सुशांत धेंडे, सुरेश देसाई यांच्यासह हरिपूरचे ग्रामस्थ उपस्थित होते.