Sangli Samachar

The Janshakti News

महाविकास आघाडीतून नाना पटोले यांची गच्छंती, चर्चेची सूत्रे थोरात यांच्याकडे !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २२ ऑक्टोबर २०२४
महाविकास आघाडीत विदर्भातील जागावरून काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना यांच्यात वादाची ठिणगी पडली आणि त्याची पाहता पाहता वणवा पसरू लागला. याचे कारण ठरले ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. पटोले यांनी विदर्भातील जागेवरील पक्षाचा दावा कायम ठेवल्याने पेटला.

ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी तर, ज्या बैठकीत नाना पटोले असतील तेथे शिवसेना चर्चेसाठी उपस्थित राहणार नाही असे जाहीरच केले. यामुळे महाआघाडीतील जागा वाटपाच्या चर्चेला ब्रेक लागला. हा वाद दिल्लीश्वरांपर्यंत पोहोचला आणि नाना पटोले यांचाच महाआघाडीतील पत्ता कट झाला. काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी आता महाआघाडीत समन्वयाची जबाबदारी वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवली आहे.


बाळासाहेब थोरात यांच्यावर महाआघाडीतील समन्वयाची जबाबदारी सोपवल्यानंतर प्रथम त्यांनी मातोश्रीवर जाऊन श्री. उद्धव ठाकरे यांची समजूत घातली. त्यानंतर ते आता शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत. यादरम्यान महाआघाडीतील बैठकीत अनेक नावावर शिक्कामोर्तब झाले असून विदर्भातील तिढा सोडवण्यात महाआघाडीतील नेत्यांना यश येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सूत्राच्या म्हणण्यानुसार आणखी एखादी च्या नेत्यांची बैठक होईल त्यामध्ये सर्व नावावर एकमत होऊन महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी आज किंवा उद्या जाहीर केले जाईल. 

यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्याला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले आहे. यातून निश्चित मार्ग निघेल. महाविकास आघाडीत सध्या ज्या घडामोडी घडताहेत, त्याला तिढा म्हणता येणार नाही. हा वाद संपुष्टात येऊ शकतो, असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीतून विधानसभेसाठी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे सहर्ष लागून राहिले आहे.