yuva MAharashtra शांत, संयमी, भ्रष्टाचारमुक्त स्वच्छ चैहरा म्हणून सुधीरदादा गाडगीळ यांना जनतेतून वाढता प्रतिसाद ! विजयाच्या हॅट्रिकची संधी !!!

शांत, संयमी, भ्रष्टाचारमुक्त स्वच्छ चैहरा म्हणून सुधीरदादा गाडगीळ यांना जनतेतून वाढता प्रतिसाद ! विजयाच्या हॅट्रिकची संधी !!!


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २७ ऑक्टोबर २०२
सांगली विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार श्री. सुधीरदादा गाडगीळ यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर, भाजपासमोर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. अनेक इच्छुकांमधून समाजमान्य चेहरा निवडण्याचे आव्हान भाजपच्या नेतृत्वासमोर उभे राहिले होते. 2014 आणि 2019 अशा दोन्ही निवडणुकीत श्री. सुधीरदादा यांनी विजय मिळवला होता. गेल्या दहा वर्षात त्यांनी केलेली विकासकामे आणि त्यांची स्वच्छ प्रतिमा यामुळे पुन्हा एकदा 'सुधीरदादाच'... अशी भाजपच्या कार्यकर्त्यांपासून राज्य पातळीवरील नेतृत्वाची भावना होती.

एकीकडे सुधीरदादांबाबत असलेली जनप्रतिमा तर दुसरीकडे गत लोकसभा निवडणुकीत घटलेला मतदानाचा टक्का व नाराजी हा मुद्दा उपस्थित होत होता. अशातच पक्षांतर्गत इच्छुकांनी उचल खाल्ली होती. विशेषतः जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व एक आक्रमक परंतु समाजात आश्वासक चेहरा म्हणून समोर आलेले श्री. शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे, त्याचप्रमाणे सर्वसामान्य कार्यकर्ता ते सांगली महापालिकेचे उपमहापौर म्हणून गरुड भरारी घेतलेले श्री. शेखर इनामदार यांनी पक्षाकडे मागितलेली उमेदवारी हा चर्चेचा विषय ठरला होता. 


आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी एकतर्फी जाहीर केलेली निवृत्ती आणि दुसरीकडे भाजपातील इच्छुकांची मांदियाळी यामुळे 2024 च्या होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा तर्फे कोणाला उमेदवारी मिळणार असा प्रश्न सर्वांसमोरच होता. अखेर पक्ष नेतृत्वाने श्री. सुधीरदादा गाडगीळ यांनाच उमेदवारी देऊन या साऱ्या चर्चांना पूर्णविराम दिला.

एकीकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत 'मी किंवा माझा मुलगा, माझी पत्नी, माझ्या नातेवाईक' यालाच उमेदवारी मिळाली पाहिजे, असे एकांगी चित्र निर्माण झालेले असताना दुसरीकडे 'मीही नाही किंवा माझा मुलगा वा कोणी नातेवाईकही नाही' अशी निस्वार्थी भावना व्यक्त करणारे सुधीरदादा गाडगीळ यांच्याच नावावर भाजपाने पसंतीची उमटवल्याने, समाजातूनही आता त्यांच्याच नावाला पसंती दिसून येत आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षाचा आदेश शिरसावंद्य म्हणून सुधीरदादा प्रचारालाही लागले आहेत. 

गत दहा वर्षात सुधीरदादांनी केलेली विकास कामे असो किंवा आपल्याकडे एखाद्या कामासाठी किंवा शिफारशीसाठी आलेली सर्वसामान्य व्यक्ती असो , सुधीर दादांनी कोणतीच कसर बाकी ठेवली नाही. महाराष्ट्र शासनाकडून आणलेल्या कोट्यावधी रुपयांच्या विकास निधीतून उभे राहिलेले डोंगरा इतके काम आणि सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता म्हणून सुधीरदादा सर्वांचीच पसंती क्रमांक एक आहेत. आणि म्हणूनच त्यांची विजयाची हॅट्रिक होणार असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांसह मतदारांनाही वाटतो आहे.