Sangli Samachar

The Janshakti News

राजारामबापू कारखान्याच्या सभासदांसाठी अध्यक्ष प्रतीक जयंत पाटील यांनी पत्रकार बैठकीद्वारे दिली आनंदाची बातमी !


| सांगली समाचार वृत्त |
इस्लामपूर - दि. ५ ऑक्टोबर २०२४
राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक जयंत पाटील यांनी सभासदांसाठी पत्रकार परिषदेमधून एक आनंदाची बातमी दिली असून, 2014 साली सहवीज आणि विस्तारवाढीसाठी सभासद ऊस उत्पादकांकडून प्रति टन 147 रुपयाची ठेव घेतली होती. ही एकूण रक्कम 24 कोटी 15 लाख इतकी होती. यापूर्वी प्रति टन 75 रुपये प्रमाणे 12 कोटी 35 लाख मागील वर्षी सभासदांना परत केले असून उर्वरित प्रति टन 72 रुपयाप्रमाणे 11 कोटी 80 लाख रुपये ऑगस्ट महिन्यात परत केले आहेत. 

याबाबतची माहिती देताना, या ठेवीवरील व्याजापोटी 2 कोटी 89 लाख 56 हजार रुपये, तर रूपांतरित ठेव रक्कमेवरील 4 कोटी 80 लाख 1000 रुपयावरील व्याजापोटी 54 लाख असे एकूण तीन कोटी 44 लाख 11 ऑक्टोंबर पूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याचे प्रतीक जयंत पाटील यांनी म्हटले आहे.


स्व. राजारामबापू पाटील यांच्या जयंती दिनापासून म्हणजेच एक ऑगस्ट 2024 पासून सभासदांना प्रतिमा होत सात किलो देण्यात येणारी साखर आता नऊ किलो इतकी देण्यात येणार आहे, असे सांगून प्रतीक पाटील म्हणाले की, दिवाळी सणाच्या निमित्ताने या साखरेचे नुकतेच वाटप सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे सभासद शेतकऱ्यांची दिवाळी गोड होण्यास मदत होईल.

राजारामबापू कारखान्याच्या चारही युनिटमध्ये ऑफ सीझनची कामे वेगाने सुरू असून, उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस या कारखान्यांना देऊन सहकार्य करावे असे आवाहन प्रतीक पाटील यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेच्या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली, बांधकाम समितीचे अध्यक्ष कार्तिक पाटील, माल खरेदी समितीचे अध्यक्ष देवराज पाटील, शेती समितीचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, जलसिंचन समितीचे अध्यक्ष प्रदीपकुमार पाटील, सचिव डी. एम. पाटील, मुख्य लेखापाल संतोष खटावकर आदी मान्यवर उपस्थित होते.