Sangli Samachar

The Janshakti News

अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचे प्रकरण विशेष तपास अधिकाऱ्याकडे सोपवण्याची काँग्रेसची मागणी !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ ऑक्टोबर २०२४
शहरातील संजयनगरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरण विशेष तपास अधिकाऱ्याकडे सोडवावे अशी मागणी आ. डॉ. विश्वजीत कदम, खा. विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, डॉक्टर जितेश कदम यांच्या उपस्थितीत एका निवेदनाद्वारे काँग्रेसने केली आहे.

जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विस्तारित भागातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार हे गंभीर प्रकरण आहे. त्याचा तपास संवेदनशीलकेने होण्याची आवश्यकता आहे. या मुलीच्या कुटुंबीयांना आधार व संरक्षण द्यावे, या गुल्ल्यातील नराधमाला कठोर शिक्षा व्हावी, ही घटना घडली तेथे गांजाचे झाड असल्याची माहिती लोक देत आहेत, त्याच्या मुळाशी हे जाण्याची आवश्यकता आहे. या भागात नशेचे पदार्थ, गोळ्या यांचा सर्रास वापर होत असल्याची माहिती देखील नागरिकांनी दिली आहे. याकडे गांभीर्याने पहात, शहरातील गुन्हेगारी अध्याय नष्ट करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.


शहरातील वाढत्या गंभीर गुन्ह्याकडे काना डोळा न करता त्याच्या मुळाशी जाण्याचा, व या गुन्ह्यातील संबंधितांना अधिकाधिक शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ. डॉ. विश्वजीत कदम यांनी केले आहे.

जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्याची आवश्यकता असल्याचे सांगून आ. डॉ. विश्वजीत कदम म्हणाले की, नशेखोरीमुळे जिल्ह्यात गुन्हेगारी वाटली असून, कॉलेज तरुणीवरही अत्याचार, हल्ले केले जात आहेत. त्यामुळे निर्भया पथकांची संख्या वाढवण्याची गरज आहे. दरम्यान काल संजयनगर येथील घडलेल्या गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. आपण जातीने लक्ष देऊन, आरोपीला अधिकाधिक शिक्षक कशी होईल याची दखल घेऊन असे आश्वासन जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांनी यावेळी बोलताना दिले.