yuva MAharashtra सांगली कॉलेज कॉर्नर वरील स्टीलचा चहा गाडा चोरणाऱ्या आरोपीला अटक !

सांगली कॉलेज कॉर्नर वरील स्टीलचा चहा गाडा चोरणाऱ्या आरोपीला अटक !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ ऑक्टोबर २०२४
सांगली शहरातील कॉलेज कॉर्नर परिसरातून लावलेला चहाचा गाडा चोरणाऱ्या आरोपींना जेरबंद करण्यात पोलीसांना यश आले आहे. या गुन्ह्यातील एक चोरटा अद्यापही पसार आहे. सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने सदरची कारवाई केली आहे. 

चोरीची घटना ही मंगळवार दिनांक 15 ऑक्टोंबर 2024 रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी संतोष वासुदेव भगत (वय 51, रा. माधवनगर) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. याप्रकरणी श्रावण सुरेश बनसोडे (वय 28, रा. दिंडी वेस, मिरज) प्रज्वल प्रकाश पांढरे (वय 23, रा. ब्राह्मणपुरी, मिरज) असे अटक केलेल्यांची नावे आहेत. तर आकाश शिवाजी पवार हा पसार झाला आहे.


संतोष भागवत यांचा चहा विक्रीचा व्यवसाय आहे. भगत यांनी चहा विक्रीचा त्यांचा स्टील गाडा हा कॉलेज कॉर्नर परिसरात असलेल्या माधवनगर रोडवरील भारत पेट्रोल पंपाजवळ साखळीने लॉक करून लावला होता. मंगळवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने सदरच्या गाड्याचा लॉक तोडून चोरून नेला. सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास भगत हे गाडा सुरू करण्यासाठी आले असता त्यांना चोरीची घटना निदर्शनास आली. यानंतर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी तातडीने तपासाच्या सूचना दिल्या. गुन्हा प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी पृथ्वीराज कोळी यांना माहिती मिळाली की, संशयित आरोपी बायपास मार्गावरील घाडगे हॉस्पिटल जवळ चोरीचा गाडा विक्री करण्यासाठी येणार आहेत. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावला असता, संशोध बनसोडे आणि पांढरे हे गाढा ढकलत येताना दिसले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी त्यांचा साथीदार आकाश पवार याच्यासोबत गुन्हा केल्याची कबुली दिली. यावेळी त्यांच्याकडून एक दुचाकी चोरीतील चहाचा गाडा असा एकूण एक लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई उपाधीक्षकाविमला एम. पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार, मच्छिंद्र बर्डे, सचिन शिंदे, रफिक मुलानी, संदीप पाटील, संदीप कुंभार, पृथ्वीराज कोळी, गौतम कांबळे, योगेश सटकले, संदीप पाटील यांच्या पथकाने केली.