yuva MAharashtra विधानसभा निवडणूकीसाठी सांगली जिल्ह्यात चौथ्या दिवशी १५ उमेदवारांचे १७ अर्ज दाखल !

विधानसभा निवडणूकीसाठी सांगली जिल्ह्यात चौथ्या दिवशी १५ उमेदवारांचे १७ अर्ज दाखल !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २६ ऑक्टोबर २०२
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी आज जिल्ह्यातील सर्व ८ मतदारसंघांतील १५ उमेदवारांची एकूण १७ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली. ही माहिती संबंधित मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.

चौथ्या दिवशी दाखल नामनिर्देशनपत्रांची माहिती पुढीलप्रमाणे :

मिरज (अ.जा.) ०२ स्टेला सुधाकर गायकवाड (अपक्ष), डॉ. सुरेश (भाऊ) दगडू खाडे (भारतीय जनता पार्टी)

सांगली ०२ जयश्री जगन्नाथ पाटील (अपक्ष), युवराज अधिकराव शिंदे (अपक्ष)

इस्लामपूर ०१ संपतराव पाटील (अपक्ष) किरण

शिराळा - निरंक, पलूस-कडेगाव - निरंक खानापूर ०२ अजित धनाजी खंदारे (अपक्ष), संतोष सुखदेव हेगडे (अपक्ष)

तासगाव-कवठेमहांकाळ ०४

रोहित रावसाहेब पाटील (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार), सुमन रावसाहेब पाटील (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार), सुमन रावसाहेब पाटील (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार), नदीम नजरूद्दीन तांबोळी (अपक्ष) 

जत ०६ तम्मनगौडा ईश्वरप्पा रवि (भारतीय जनता पार्टी), तम्मनगौडा ईश्वरप्पा रवि (अपक्ष), महादेव मुरग्याप्पा हुचगोंड (अपक्ष), श्रीशैल सातलिंग उमराणी, (अपक्ष), संजय दऱ्याप्पा कांबळे (अपक्ष), वगरे शंकर रामू (अपक्ष).

नामनिर्देशन पत्र भरण्याची अंतिम तारीख मंगळवार दि. २९ ऑक्टोबर २०२४ असून नामनिर्देशन पत्राची छाननी बुधवार दि. ३० ऑक्टोबर २०२४ होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख सोमवार दि. ४ नोव्हेंबर २०२४ आहे. दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी शनिवार दि. २३ नोव्हेंबर २०२४ रोजी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख सोमवार दि. २५ नोव्हेंबर २०२४ आहे.