Sangli Samachar

The Janshakti News

दूरदृष्टी असणारे संयमी व निर्गवी अजातशत्रू असे नेते म्हणजे प्रकाश बापू पाटील - संभाजी राजे पाटील


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ ऑक्टोबर २०२४
सांगली जिल्ह्याचे माजी खासदार हिंद रत्न प्रकाश बापू पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी येथे अभिवादन करण्यात आले. प्रारंभी कवठेमंकाळचे विलासराव बोराडे व कुंडलचे उत्तमराव पाटील यांचे हस्ते स्वर्गीय प्रकाश बापू पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी बोलताना सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बीडचे संभाजीराजे पाटील यांनी बोलताना प्रकाश बापू पाटील हे दूरदृष्टीची नेते होते. निगर्वी आणि संयमी नेतृत्व असणारे हे प्रकाश पाटील यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये गोरगरीब शेतकरी कष्टकरी लोकांच्या प्रश्नावर संसदेमध्ये त्यांनी प्रश्न मांडून ते सोडवण्याचे काम केलेलेआहे. 


1999 साली काँग्रेस पक्ष अडचणीत असताना सांगली मधून त्यांनी काँग्रेस बरोबर राहण्याचा निर्णय घेतला त्यांना माननीय डॉक्टर पतंगरावजी कदम व माननीय शिवाजीराव देशमुख यांनी साथ दिली. त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचे खासदार ते स्वतः व जिल्ह्यामध्ये पाच आमदार निवडून आले होते. 

यावेळी अनिल मोहिते श्रीमंत पांढरे माजी नगरसेवक अल्ताफ खान यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी स्वागत व प्रास्ताविक अजित ढोले जिल्हाध्यक्ष काँग्रेस सेवादल व शेवटी आभार प्रवेश संघटक पैगंबर शेख यांनी मानले 

यावेळी अल्लाबक्ष मुल्ला प्रकाश माने अरुण पळसुले प्रा नंदादेवी कोलप सौ प्रतीक्षा काळे विठ्ठलराव काळे संजय शिकलगार लालसाब तांबोळी नामदेव पठाडे मूफीत कोळेकर विश्वास यादवसुनील गुळवणी बाबगोंडा पाटील शैलेंद्र पिराळे सागर सर्व दे प्रथमेश शेटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


जुन्या आठवणी...

स्वर्गीय हिंदरत्न प्रकाश बापू पाटील यांच्या समवेत माजी आमदार राजाभाऊ जगदाळे माजी मंत्री अजितराव घोरपडे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब वाघमोडे माजी नगराध्यक्ष अजित भाई शिकलगार नारायण माने व सांगली धनगर गल्ली येथील धनगर समाज...