yuva MAharashtra "लाडक्या बहिणीला मिळणार मोफत मोबाईल"... हा मेसेज तुम्हालाही आलाय का ? मग ही बातमी तुमच्यासाठीच !

"लाडक्या बहिणीला मिळणार मोफत मोबाईल"... हा मेसेज तुम्हालाही आलाय का ? मग ही बातमी तुमच्यासाठीच !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १३ ऑक्टोबर २०२४
सध्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना तुफान लोकप्रियता मिळवत आहे. अनेक अडथळ्यांच्या शर्यतीतून ही योजना मार्गी लागलेली आहे. सध्या लाभार्थी बहिणीच्या बँक खात्यात साडेसात हजार रुपये जमा झाले असून दीपावलीपूर्वी आणखी तीन हजार रुपये जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे.

एकीकडे महिलांना भाऊबीज केले जात असतानाच, अनेक फसवणुकीच्या घटना समोर आले आहेत. बँकांनी फसवणूक नव्हे पण, खात्यावरील कमी रकमेचे कारण देत, बहिणींच्या खात्यातून भाऊबीजेच्या रकमेपैकी काही रक्कम वळती करून घेतली. तर काही ठिकाणी सर्वच रक्कम वजा झाली आहे. यामुळे महिला वर्गात नाराजी व्यक्त होताच, महाराष्ट्र शासनाने सदर महिलांच्या खात्यातील वळती केलेली रक्कम पुन्हा खात्यात जमा करावी अशी आदेश काढले आहेत.


सातारा येथील एका महाभागाने तीच महिलांच्या नावावर वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून लाडक्या बहिणींसाठी ऑनलाईन अर्ज केले. आता संबंधित इसम आणि त्याचे सहचरणी जेलची हवा खात आहेत. सध्या सोशल मीडिया वरून एक मेसेज व्हायरल होत असल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.

या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना 'मोफत मोबाईल मिळणार' असल्याचा एक मेसेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. आणि सर्वत्र हीच चर्चा सुरू झाली. या योजनेसाठी महिलांनी अर्ज करावेत असेही या मेसेजमध्ये म्हटलं आहे. परंतु हा मेसेज महिलांची फसवणूक करणारा असल्याचे पोलीसांनी जाहीर केला आहे. शासनाची अशी कोणतीही ' मोफत मोबाईल' देण्याची योजना नाही. महिलांनी या मेसेजला बळी पडून कोणताही मेसेज कुठल्याही मोबाईल नंबरवर करू नये. त्यामुळे मोठी फजगत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींनी या किंवा आशा मोफतच्या मेसेज बाबत जागृती बाळगावी असेही पोलीस खात्याकडून सूचित करण्यात आले आहे.