| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ ऑक्टोबर २०२४
जगातील आघाडीच्या आभूषण विक्रेत्यांपैकी एक असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सने महाराष्ट्र राज्यातील आक्रमक विस्ताराचा एक भाग म्हणून आज सांगली येथे आपल्या नवीनतम शोरूमचे उदघाटन खा. विशाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मालाबार गोल्ड आणि डायमंड्सच्या सांगली शाखेचे प्रमुख आशिष महागावकर मलाबार गोल्डचे वेस्ट झोन मार्केटिंग मॅनेजर ऋषिकेश पवार आणि क्षेत्र दुबई यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. सांगली मिरज मार्गावरील विश्रामबाग येथे सुरू झालेले मलाबार गोल्ड हे शोरूम देशातील 280 वे तर महाराष्ट्रातील 26 वे दालन असून जगभरात 13 देशांमध्ये 360 हुन अधिक शोरूममध्ये मलाबार गोल्ड वैश्विक उपस्थितीत योगदान देते.
माईंड डायमंड ज्वेलरी, एरा अनकट डायमंड्स, डिव्हाईन हेरिटेज ज्वेलरी आणि बरेच काही यासारख्या ब्रँडच्या खास संग्रह या नव्या ४,८०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या शोरूम मध्ये सोने, हिरे, पोल्की रत्न, आणि प्लॅटिनम दागिन्यांचे विस्तृत श्रेणी ग्राहकांना निवडीसाठी उपलब्ध असेल.
यावेळी मनोगत व्यक्त करताना एम. पी. अहमद म्हणाले की सांगलीमध्ये आमचे नवीन विक्री दालन सुरू करून, महाराष्ट्रात आमचा ठसा वाढवताना आम्हाला आनंद होत आहे. नवीन दालनाचे हे अनावरण केवळ या परिसरातील आमची उपस्थिती मजबूत करत नाही तर जागतिक दर्जाच्या दागिन्यांची खरेदी करण्याचा अनुभव ग्राहकांच्या व्यापक वर्गाला प्रदान करण्याच्या वचनबद्धतेची पुष्टी करणारे आहे. जनसमुदायाचा एक विश्वासार्ह भाग बनण्यासाठी आणि आमच्या ग्राहकांशी कायमस्वरूपी संबंध निर्माण करण्यास उत्सुक आहोत.
विविध 26 देशांमध्ये जवळपास 22 हजार बहुभाषिक कर्मचाऱ्यांच्या पाठिंब्याने मलबार शंभर शहरांमध्ये दीड कोटी ग्राहकांना सेवा देते. त्यांच्या 'वन इंडिया वन गोल्ड रेट' उपक्रमाचा एक भाग म्हणून मलाबार भारतीय विक्री दालनामध्ये एकसमान किंमत प्रस्तुत करून, पारदर्शकता आणि निष्पक्षतेचे ग्राहकांना ठोस हमी देते.
नेहमीप्रमाणेच मलाबारने पारदर्शक किंमत, आजीवन मोफत देखभाल, जुन्या सोन्याने हिरांच्या दागिन्यांसाठी शंभर टक्के पुनर्खरेदी (बायबॅक) मूल्य, प्रमाणित दर्जाचे हिरे, एचयुआयडी अनुरूप सोने, आणि ग्राहकांचे पूर्ण समाधान सुशिक्षित करून दागिन्यांचा मोफत विमा असे आश्वासन मनासारखे धरणात येणाऱ्या नवीन ग्राहकांसाठी कायम ठेवली आहेत.
मला पण त्याच्या सीएसआर आणि ईएसजी उपक्रमासाठी वचनबद्ध आहे. आमच्या नफ्यापैकी पाच टक्के रक्कम, आरोग्य सेवा, शिक्षण गृहनिर्माण आणि पर्यावरणीय टिकाऊपणा या कारणासाठी नित्यनेमाने खर्च करीत असते सामाजिक उत्तरदायित्वावरील हे लक्ष ब्रँडचे नैतिक व्यवसाय पद्धती आणि शाश्वत वाढीसाठीचे समर्पण प्रतिबिंबित करते.