| सांगली समाचार वृत्त |
विटा - दि. २७ ऑक्टोबर २०२४
आपण ज्या समाजातून आलो. त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो याची जाण आणि भान निर्माण करून देणारे शिक्षण शालेय जीवनात दिल्याशिवाय खऱ्या अर्थाने देश व समाज विकासाची प्रक्रिया गतिमान होणार नाही असे मत जेष्ठ लेखक व अर्थशास्त्राचे अभ्यासक प्रा. संजय ठिगळे यांनी व्यक्त केले.
डी. आर. नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिटयूटच्या डिव्हाइन क्लब कीड व अमृतराव इंटरनॅशनल स्कूलचे स्नेह संमेलन असा संयुक्त कार्यक्रम लेंगरे येथील श्रीरामकृष्ण मंगल कार्यालयात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ लेखक प्रा. संजय ठिगळे उपस्थित होते. अध्यक्षस्थान अमृतराव नाईक निंबाळकर यांनी भूषवले.
प्रारंभी उपस्थितांचे स्वागत प्राचार्य सचिन गायकवाड यांनी केले. संस्थेच्या उपप्राचार्य पूजा कोले यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. शारिका मुल्ला यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे संयोजन केले. विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
मार्गदर्शनपर भाषणात प्रा. संजय ठिगळे म्हणाले की, इथून पुढच्या काळात गुणांच्या बरोबरच मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक गुणवत्तेलासुद्धा अधिक महत्व देण्याची गरज आहे. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांची बौद्धिक प्रगती बरोबरच त्याचे भावविश्व जोपसण्याची गरज बरोबरच आहे. तरच खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती होईल.
मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक गुणवत्तेलासुद्धा अधिक महत्व
सौ. सुवर्णा ठिगळे त्याचबरोबर
वर्ग उपस्थित होता.
देण्याची गरज आहे. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांची बौद्धिक प्रगती बरोबरच त्याचे भावविश् जोपसण्याची गरज बरोबरच आहे. तरच खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती होईल.
अध्यक्षपदावरून बोलताना अमृत नाईक निंबाळकर म्हणाले की, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने डी. आर. नाईक निंबाळकर एज्यूकेशन इन्स्टिटयूट डिव्हाइन क्लब कीड व अमृतराव इंटरनॅशनल स्कुलच्या माध्यमातून शहरी भागाबरोबरच लेंगरे सारख्या ग्रामीण भागात सातत्याने प्रयत्न करीत आहे. या प्रसंगी संस्थेच्या सचिव मिनाक्षी नाईक निंबाळकर, सौ सुवर्णा ठिगळे त्याचबरोबर मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होता.