| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ ऑक्टोबर २०२४
घरच्या स्वयंपाकात लसणाशिवाय स्वयंपाक होतच नाही. आणि सध्या बाजारात मिळणाऱ्या संभावित चिनी लसणावरून वातावरण गरम झाले आहे. बाजारात मिळणारा हा चिनी लसूण आरोग्यास अत्यंत घातक असून यापासून चा धोका संभवतो असे तज्ञांनी म्हटल्यानंतर हा चिनी लसूण ओळखायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत तज्ञांनी माहिती दिली असून, बाजारात सध्या विक्रीस उपलब्ध असलेला चिनी लसूण नेहमीच्या गावरान लसणापेक्षा जाड आहे. त्याला गंध नाही, याचं कारण म्हणजे यामध्ये रासायनिक पदार्थांचा करण्यात आलेला वापर. या लसणामध्ये सिंथेटिकसुद्धा मिसळले जात असल्याचा आरोप होत आहे. तसेच यामध्ये झिंक आणि आर्सेनिकचाही वापर केला जातो, ज्यामुळे कॅन्सरचा धोका अधिक वाढतो. आणि म्हणूनच नागरिकांनी सजग होऊन लसुण खरेदी करावा, असे तज्ञांचे मत आहे.
आता नेहमीच्या गावरान लसणाबाबत. गावरान लसूण हा लहान असून त्याला हातात घेताच, लसणाचा नेहमीचा तीव्र गंध तुमच्या नाकात शिरेल. या लसणाला हलकीशी निळसर, जांभळट रंगाची शेड आहे. लसणाच्या एका बाजूला आपणाला मूळही दिसतात जी काळी किंवा गडद चॉकलेटी रंगाची असतात. तसेच प्रश्नावर बरेच डाग हे असतात. चिनी लसूण हा चटकन सोलला जातो, तर वेळ लागतो. तसेच यामध्ये चिकटपणा आहे अधिक असतो.
त्यामुळे आता बाजारात तुम्ही लसूण घ्यायला गेलात तर वरील सूचना लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला आरोग्याच्या समस्याशी तडजोड करावी लागणार नाही.