yuva MAharashtra पाणी बिले न भरल्यास महिन्याला दीड टक्के व्याजाची आकारणी, महापालिकेकडून होणार कारवाई !

पाणी बिले न भरल्यास महिन्याला दीड टक्के व्याजाची आकारणी, महापालिकेकडून होणार कारवाई !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ९ ऑक्टोबर २०२४
महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी आयुक्त श्री. शुभम गुप्ता यांनी कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली असून, याचाच एक भाग म्हणजे सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका हद्दीतील ग्राहकांकडून पाणीपट्टी वेळेत वसूल त्यासाठी उचललेले पाऊल. त्यामुळे आता महापालिकेकडून माहे एप्रिल 2024 ते जुलै 2024 अखेर पाणीपट्टीच्या बिलांचे वाटप करण्यात आली आहेत. ग्राहकांनी पाणीपट्टीची बिले भरणा करण्यासाठी सांगली शहरातील ग्राहकांकरिता मंगलधाम इमारत जिल्हा परिषद जवळ, सांगली. मिरज शहरातील ग्राहकांसाठी लक्ष्मी मार्केट महापालिका ऑफिस, तर कुपवाड शहरातील ग्राहकांसाठी, कुपवाड मधील महापालिकेच्या कार्यालयात सोय करण्यात आली आहे.


आज अखेर 23,280 इतक्या नागरिकांनी पाणीपट्टीचे बिले अदा केले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे भर पडली आहे. परंतु अद्यापही ग्राहकांना पाणीपट्टीची बिले न मिळण्याची शक्यता असल्याने अशा ग्राहकांनी महापालिकेशी संपर्क साधून बिले प्राप्त करून घ्यावेत व वेळेत बिले अदा करावीत. 

जे ग्राहक पाणीपट्टीचे बिले मिळाल्यानंतर एक महिन्याच्या आत बिले न भरल्यास महिन्याला दीड टक्के व्याजाचे आकारणे करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली पाणीपट्टीची बिले वेळेत भरून महापालिकेचे सहकार्य करावे व होणाऱ्या कारवाई पासून मुक्ती मिळवावी असे आवाहन, महापालिकेचे आयुक्त श्री. शुभम गुप्ता यांनी केले आहे.