Sangli Samachar

The Janshakti News

शासकीय मालमत्तेवरील 8000 फलक बॅनर्स ध्वज हटवले, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ ऑक्टोबर २०२४
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता जिल्ह्यात 15 ऑक्टोंबर रोजी लागू झाल्यानंतर पहिल्या 24 तासातच सर्व मतदार संघात प्रशासनाच्या वतीने शासकीय इमारती आणि शासकीय मालमत्तेच्या आवारातील जाहिरात फलके, भित्तीपत्रके, भिंती चित्रे, बॅनर्स, ध्वज, आदि एकूण 8079 प्रचार साहित्य तात्काळ प्रभावाने हटवण्यात आल्याची माहिती अपर जिल्हादंडाधिकारी तथा आचारसंहिता कक्षाच्या नोडल अधिकारी ज्योती पाटील यांनी दिली.

शासकीय मालमत्तेच्या आवारातील हटवण्यात आलेले फलक, बॅनर्स आदींचे विधानसभा मतदारसंघ निहाय संख्या पुढील प्रमाणे. मिरज ५४२, सांगली २५२, इस्लामपूर ५३२, शिराळा ८०३, पलूस कडेगाव १२३५, विटा १८२३, तासगाव कवठेमंकाळ १०७४, जत ११८५. यामध्ये वर्ल्ड रायटिंग १९६२, पोस्टर्स २१८३, कटआउट १५०३, बॅनर्स १६१८, फ्लॅग ८१३ असे एकूण ८०७९ साहित्य हटवण्यात आल्याचे ज्योती पाटील यांनी म्हटले आहे. सार्वजनिक मालमत्ते अंतर्गत वॉल रायटिंग १६३०, पोस्टर्स १३२६, फ्लॅग ८७२ असे एकूण ६७९७ साहित्य हटवण्यात आल्याचेही ज्योती पाटील यांनी सांगितले.