| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ७ ऑक्टोबर २०२४
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची तयारी प्रदेश भारतीय जनता पक्षाने विविध स्तरावर वेगाने सुरू केली आहे. या निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्राला मूलभूत व पायाभूत क्षेत्रात वेगवान व प्रगतिशील करण्याच्या दृष्टीने, गठित करण्यात आलेल्या जाहीरनामा समितीच्या सदस्यपदी माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांचे निवड करण्यात आली आहे.
हे कार्य अधिक सुलभ व सुटसुटीत व्हावे यासाठी विषयानुरूप विविध समित्या तयार करण्यात आल्या आहेत. यापैकी 'छत्रपती शिवाजी महाराज' उपसमितीमध्ये भाजप नेते व माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांची समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. सध्या ते हिंदू एकता प्रदेशाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.
तरुणा संबंधी विविध क्षेत्रांमध्ये नवीनतम प्रयोग करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. माजी आमदार नितीन शिंदे यांचा अनुभव आणि कल्पनाशक्ती पणाला लावून, महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य दिशा देणारा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीने, त्यांच्याकडून भाजपाने विविध सूचना, मुद्दे, निरीक्षणे आदीबाबत आपले मत मागविले आहे.
प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेला अफजलखानाच्या दर्ग्याचा अतिक्रमित भाग उध्वस्त करण्यासाठी श्री. नितीन शिंदे यांनी गेली अनेक वर्षे सातत्याने आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळेच महायुती सरकारने काही वर्षांपूर्वी हा भाग बुलडोजरने उध्वस्त केला होता हे विशेष. सध्या ते विशाळगडावरील अतिक्रमित बांधकामे उध्वस्त करण्यासाठी उभारण्यात आलेल्या आंदोलनात अग्रस्थानी आहेत.
विधान परिषदेचे माजी आमदार म्हणून तरुणांच्या प्रश्नावर श्री. नितीन शिंदे यांनी सभागृहात अतिशय आक्रमकपणे प्रश्न मांडून तरुणांना न्याय मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. चिंतामणी नगर येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या प्रलंबित बांधकामाबाबत त्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले आहे. याचाच परिणाम म्हणून नुकतीच या रेल्वे उड्डाण पुलावरून एकेरी वाहतूक सुरू झाली आहे. त्यांच्या अशा आक्रमक स्वभावामुळेच त्यांच्याकडे तरुणांचा मोठ्या प्रमाणावर ओढा आहे. या माध्यमातूनच त्यांनी आक्रमक तरुणांचे संघटन तयार केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री. नितीन शिंदे यांची ही निवड भाजपाच्या यशासाठी निश्चितच फायद्याची ठरणार असल्याचे प्रतिक्रिया विविध घटकांकडून व्यक्त होत आहे.