Sangli Samachar

The Janshakti News

शिंदे सरकारकडून माझ्यामागे चौकशीचा ससेमिरा, शाळेतील माझ्या मुला मुलीचीही होतीये चौकशी - आ. नितीन देशमुख


| सांगली समाचार वृत्त |
बाळापूर - दि. ५ ऑक्टोबर २०२४
आगामी निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न ठाकरे गटातून नेहमीच होत आहे. आता आमदार नितीन देशमुख यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर निशाणा साधला असून बाळापूरचे आमदार नितीन देशमुख म्हणाले की, शिंदे सरकारने माझ्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला असून, चक्क दहावीतील माझ्या मुलाची ही चौकशी होत आहे. तर आठवीत शिकणाऱ्या माझ्या मुलीचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी केली जात आहे. 

पक्ष फुटला तेव्हा मी सुरतला गेलो पण ते कुठल्या परिस्थितीत हे मतदारसंघातील सारेच लोक जाणतात. त्यावेळी काही लोक माझा घातपात करण्याच्या प्रयत्न असल्याचा आरोपही देशमुख यांनी यावेळी बोलताना केला. पक्ष फुटला, गद्दारी झाली. मला हार्ट ॲटॅक आल्याचेही बातमीदारांना सांगितलं. खरंतर मला असा कोणताही ॲटॅक आलेला नव्हता. त्यांना केवळ तशी बातमी पसरवायची होती.

बाळापूरमधील मतदारांशी संवाद साधताना, आमदार नितीन देशमुख यांनी शिंदे गटावर केलेल्या या आरोपामुळे पुन्हा एकदा शिवसेना कुठे दरम्यानचा प्रसंग आणि आरोप ऐरणीवर आले आहेत. आता यावर शिंदे गट काय प्रतिक्रिया देतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 


जसजशी निवडणूक जवळ येईल तस तसा आरोप प्रत्यारोपचा हा खेळ सुरूच राहणार आहे. यातून कोण घायाळ होतं ? कुणाला फटका बसतो ? तर कोणाला याचा फायदा होतो, हे मात्र निवडणूक निकालानंतरच सर्वांसमोर येणार आहे. मात्र तोपर्यंत जनतेला हा कलगीतुरा पहावयास लागणार आहे. कालच सांगली येथे बोलताना भाजप नेते व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी हल्लीच्या राजकारणावर टीका केली होती. त्याचेच प्रत्यंतर आ. नितीन देशमुख यांच्या आरोपाने जनतेला येत आहे.