| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. १७ सप्टेंबर २०२४
केंद्र शासन नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना सादर करीत असते. परंतु आजपर्यंत केवळ प्रौढ व्यक्ती किंवा विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी या योजना राबविल्या जातात. लहान बालकांच्या भवितव्यासाठी आतापर्यंत फारशा योजना आणल्या गेल्या नव्हत्या. परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जुलैमध्ये सादर केलेल्या 2024-25 सर्व साधारण अर्थसंकल्प 'एनपीएस वास्तव्य' या नावीन्यपूर्ण पेन्शन योजनेची घोषणा केली होती. उद्यापासून या योजनेचा प्रारंभ होणार असून, यामध्ये नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू करण्यात येणार आहे.
प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याच्या भवितव्याची काळजी असते. त्याचे शिक्षण, त्याची कौटुंबिक आयुष्य किंबहुना एकंदरच आर्थिक प्रगती यासाठी प्रत्येक पालक धडपडत असतो. आपल्या आयुष्याची बहुमूल्य वर्षे तो यासाठी खर्ची घालत असतो. 'एसपीएस वास्तल्य योजने'मुळे पालकांचे बरेचसे टेन्शन कमी होणार आहे.
खाते उघडण्याची ऑनलाइन प्रक्रिया
सर्वप्रथम तुम्हाला नॅशनल पेन्शन सिस्टमच्या https://www.npscra.nsdl.co.in/ या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
त्यानंतर होमपेजवर तुम्हाला Registration नावाचा टॅब दिसेल, त्यावर क्लिक करा.
तुम्हाला Register with Aadhar Card आणि Register with PAN Card असे दोन पर्याय दिसतील.
आधार कार्डसह नोंदणी करा हा पर्याय निवडा. त्यानंतर तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाका आणि OTP जनरेट करा. तुमच्या आधारशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी पाठवला जाईल. OTP प्रविष्ट करा आणि नंतर सत्यापन बटणावर क्लिक करा.
आधार क्रमांकाशी संबंधित तुमची काही माहिती आधीच भरलेली असेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्वाक्षरीची स्कॅन केलेली फोटो कॉपी अपलोड करावी लागेल. त्यानंतर तुमच्या आवडीच्या पेमेंट मोडद्वारे खाते उघडण्याचे शुल्क भरा. यशस्वी पेमेंट केल्यानंतर तुमचे NPS खाते उघडले जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा खाते क्रमांक आणि पासवर्ड मिळेल.
काय आहे NPS वात्सल्य योजना ?
तुमच्या मुलांच्या नावाने नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) वात्सल्य योजनेत गुंतवणूक करणे हा त्यांच्या भावी आर्थिक सुरक्षिततेची खात्री करण्याचा एक चांगला मार्ग आहे. NPS वात्सल्य ही एक दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे, जी पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) द्वारे व्यवस्थापित केली जाते. कोणताही भारतीय, मग तो निवासी असो अथवा अनिवासी, या योजनेत मुलांच्या नावाने खाते उघडू शकतो. मुलाचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर योजना नियमित NPS मध्ये बदलली जाईल. विशेषतः गतिमंद आणि अपंग किंवा विशेष बालकांसाठी ही योजना खूपच उपयोगाची ठरू शकते.
आवडीनुसार गुंतवणूक करू शकता
तुम्ही आता तुमच्या मुलाच्या NPS वात्सल्य योजना खात्यात दरमहा किमान 500 रुपये किंवा प्रति वर्ष 6,000 रुपये जमा करू शकता. शिवाय, तुम्ही तुमच्या आवडीनुसार इक्विटी, डेट किंवा मनी मार्केटमध्ये गुंतवणूक करू शकता. असे केल्याने तुम्ही जमा केलेल्या रकमेवर कर लाभ देखील मिळवू शकतो. तुमच्या मुलाचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर त्याच्या NPS वात्सल्य योजनेच्या खात्यातून ती रक्कम काढता येईल. एवढेच नाही, तर तुमच्या मुलाला 60 वर्षे पूर्ण झाल्यावर पेन्शनही मिळू शकते. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यास उशीर करू नका. यामुळे भविष्यात तुमच्या मुलांना आर्थिक सुरक्षा मिळेल.