yuva MAharashtra सहकार भारतीच्या कोषाध्यक्षपदी सांगलीतील श्री. गणेश गाडगीळ यांची अभिनंदन निवड!

सहकार भारतीच्या कोषाध्यक्षपदी सांगलीतील श्री. गणेश गाडगीळ यांची अभिनंदन निवड!


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २५ सप्टेंबर २०२४
सहकार भारतीचे 14 वे त्रैवार्षिक अधिवेशन दि. 21 व 22 सप्टेंबर रोजी शिर्डी येथे संपन्न झाले. यावेळी 2024 ते 2017 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये प्रदेश अध्यक्षपदी दत्ताराम चाळके आणि प्रदेश महामंत्री म्हणून विवेक जुगादे यांचे बिनविरोध निवड करण्यात आली. 

यानंतर सहकार भारतीच्या प्रदेश स्तरावरील नियुक्तीची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेशराव गाडगीळ यांची प्रदेश कोषाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. तसेच संचालिका अश्विनी आठवले यांची प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी निवड झाल्याचे महामंत्री विविध जुगादे यांनी जाहीर केले आहे.

यावेळी सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी, राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पाचपोर, भारतीय रिझर्व बॅंकेचे संचालक सतीश मराठे, माजी प्रदेश अध्यक्षा शशीताई अहिरे, प्रदेश संपर्कप्रमुख संजय परमणे, महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रम्हेचा, टीजेएसबी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, जनता सहकारी बँक पुणे चे अभय माटे इत्यादी मान्यवर तसेच राज्यभरातून विविध जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

दरम्यान श्री गणेश गाडगीळ व सौ. अश्विनी आठवले यांच्या निवडीबद्दल सांगली अर्बन बँक परिवारातून व बँकिंग क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.